‘केजीएफ 2’ च्या बजेटपेक्षा दहापट जास्त मानधन घेणार | पुढारी

‘केजीएफ 2’ च्या बजेटपेक्षा दहापट जास्त मानधन घेणार

पुढारी ऑनलाइन डेस्क : अभिनेता सलमान खान गेली अनेक वर्षे टी.व्ही.वरील रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’चा होस्ट म्हणून काम करत आहे आणि दरवर्षी त्याने होस्टिंगसाठी मानधन वाढविल्याची बातमी येत असते, तशी ती यंदाही आली आहे. या रिअ‍ॅलिटी शोचा 16 वा सिझन येत्या काही काळात सुरू होईल. या शोमध्ये यंदा कोण स्पर्धक असतील, त्याविषयीचे अंदाज समोर येत आहेत. तर या सिझनसाठी सलमानने मानधनात वाढ केली आहे. हे मानधन किती असावे? तर ‘केजीएफ : चॅप्टर 2’ या चित्रपटाच्या बजेटपेक्षा दहापट जास्त मानधन सलमान घेणार आहे.

सलमानने या शोच्या गत सिझनसाठी 350 कोटी रुपये मोबदला घेतला होता. तर सोळाव्या सिझनसाठी सलमान 1000 कोटी रुपये चार्ज करणार असल्याची चर्चा आहे. ‘केजीएफ 2’ने बॉक्स ऑफिसवर 1207 कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाचे बजेट 100 कोटी रुपये होते.

Back to top button