खुशी कपूर देतेय जान्हवीला टक्कर | पुढारी

खुशी कपूर देतेय जान्हवीला टक्कर

पुढारी ऑनलाइन डेस्क : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मोठी कन्या अभिनेत्री जान्हवी कपूरने कमी वेळात तिचा चाहता वर्ग निर्माण केला आहे. जान्हवी सोशल मीडियात नेहमी सक्रिय असते आणि तिच्या लूकची नेहमीच चर्चा होत असते. आता श्रीदेवी यांची दुसरी कन्या खुशी कपूर हि चर्चेत आली असून स्टाईल स्टेटमेंटबाबत ती बहीण जान्हवीलाही टक्कर देत आहे. बी-टाऊनमधील सुप्रसिद्ध स्टारकिडस्पैकी एक असलेली खुशी देखील सोशल मीडियात सक्रिय असते. स्वतःचे फोटोज, व्हिडीओज ती शेअर करत असते. अगदी बोल्ड फोटोजमध्येही ती जान्हवीला टक्कर देत असते.

नुकतेच खुशीने इन्स्टाग्रामवर बिकिनीतील काही फोटोज शेअर केले आहेत. त्यावर इंडस्ट्रीतील अनेकांसह शाहरूख खानची कन्या सुहानानेही प्रतिक्रिया दिली आहे. खुशी कपूर येत्या काळात झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ द्वारे बॉलीवूड पदार्पण करणार आहे. यात सुहाना खान आणि अगस्त्य नंदा, इब्राहिम अली खान हे स्टारकिडस् असल्याचीही चर्चा आहे.

Back to top button