'पुणे टू गोवा' : केतकी माटेगावकरचं नवं गाणं पाहिलं का? | पुढारी

'पुणे टू गोवा' : केतकी माटेगावकरचं नवं गाणं पाहिलं का?

मुंबई; पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री, गायिका केतकी माटेगावकरने ‘पुणे टू गोवा’ या हिंदी चित्रपटासाठी नुकतेच पार्श्वगायन केले. ‘पुणे टू गोवा’ चित्रपटातील “सारी कसर दिल की तुझंपे निकाल दु ! मे रात भर तुझे प्यार दू” असे गीताचे बोल आहेत. नुकतेच या गाण्याचे रेकॉर्डिंग पार पडले.

या गीताला संगीतबद्ध सन्मित वाघमारे यांनी केले आहे. संगीत संयोजन अमोघ इनामदार यांनी केले आहे. गीताचे बोल गीतकार रॅपर ब्रोज यांचे आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल भगत हे आहेत.

ketaki mategaonkar
केतकी माटेगावकर

केतकीने विविध भाषांमध्ये पार्श्वगायन केले आहे. या गाण्याचे बोल व संगीत भारावून टाकणारे आहे. या गीताचे बोल लयबद्ध आहे. गीत गाताना खूप छान वाटले असे केतकीने सांगितले.

या गीताला केतकी माटेगावकर, हिंदीतील प्रसिद्ध गायक शाहिद मल्या यांचा आवाज लाभलेला आहे. ‘पुणे टू गोवा’ हा चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला येईल. अशी माहिती चित्रपटाचे निर्माते आदित्यराजे मराठे यांनी दिली. तसेच प्रल्हाद तावरे, किशोर खरात यांनी दिली. दिग्दर्शक अमोल भगत म्हणाले.

हिंदीतील मल्टिस्टार कास्ट या चित्रपटात रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

ketaki mategaonkar
केतकी माटेगावकर

केतकीच्या या गाण्याची पडेल भूरळ

गायिका, अभिनेत्री केतकी माटेगावकर हिचे नवे गाणे संगीत रसिकांच्या भेटीला येत आहे. केतकी माटेगावकर हिच्या गाण्याचे चांदणे तुझ्यावरी असे बोल आहेत. ४ सप्टेंबरला हे गाणे भेटीला येईल. तशी पोस्ट केतकीने फेसबूकवर लिहिली आहे. सोबतचं या व्हिडिओची झलकदेखील तिने शेअर केली आहे.

चांदणे तुझ्यावरी | 4th September ला येतोय. स्वत: गायिका केतकी माटेगावकरने हे गाणे गायलंय. धवल चंदवाडकर यांचे संगीत आहे. तर कल्याणी पई यांचे गीत आहे. वयाच्या चौथ्या वर्षापासून केतकीने संगीतक्षेत्रात पदार्पण केलं होतं. ती एक गायिका असण्यासोबतच उत्तम अभिनेत्रीही आहे.‘शाळा’ या चित्रपटातून या अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.

आरोही, तानी, काकस्पर्श, टाईमपास यासारखे चित्रपट तिच्या नावावर आहेत. टाईमपासमध्ये तिने दगडूच्या प्राजक्ताची भूमिका साकारली होती.

काकस्पर्शसाठी तिला ‘मिफ्ता अवॉर्ड्स २०१२’मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. शाळासाठी तिला ‘फिल्मफेअर ॲवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले.  केतकी माटेगावकरचा जन्म २२ फेब्रुवारी, १९९४ मध्ये नागपूर येथे झाला. टाईमपास’, ‘शाळा’, ‘काकस्पर्श’ यासारखे हिट चित्रपट करून आपली एक वेगळी ओळख तिने मराठी सिनेसृष्टीत निर्माण केली.‘सारेगमप लिटल चॅम्प’मध्ये ती सहभागी झाली होती. पुढे तिने मराठी अभिनय क्षेत्रात आली. केतकीचा तानी हा आठवणीतला चित्रपट आहे.

तिच्या शाळा चित्रपटातील शिरोडकरची भूमिका ही प्रेक्षकांच्या मनात घर करून केली. यानंतर टाईमपासमधील प्राजक्ताच्या भूमिकेने तिला सिनेसृष्टीत अधिक उंचीवर नेले.

केतकीची आई सुवर्णा माटेगांवकर प्रसिद्ध गायिका आहेत. वडील उत्तम हर्मोनियम वादक आहेत. तिचा मोठा चाहता वर्ग असल्याचं पाहायला मिळतो. केतकीच्या सौंदर्यानेही चाहत्यांना भुरळ घातली आहे.

हेही वाचलं का?  

Back to top button