प्रियांका चोप्रा हिला सेटवर झाली दुखापत | पुढारी

प्रियांका चोप्रा हिला सेटवर झाली दुखापत

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आगामी ‘सिटाडेल’ चित्रपटाचे शुटिंगमध्ये बिझी आहे. या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान प्रियांका चोप्रा हिला दुखापत झाली आहे. प्रियांकाने याबाबातची माहिती एक फोटो शेअर करून दिली आहे.

प्रियांका चोप्रा लंडनमध्ये आगामी ‘सिटाडेल’ या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटात ती एका गुप्तहेराची भूमिका साकारत असून तिच्यासोबत या चित्रपटात रिचर्ड मॅडन आणि पेड्रो लिएंड्रो यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाच्या शुंटिंगदरम्यान प्रियांकाला कपाळावर दुखापत झाली आहे.

इंस्टाग्राम स्टोरीवर ही माहिती

प्रियांकाने नुकतेच इंस्टाग्राम स्टोरीवर दोन फोटो शेअर करून याची माहिती सांगितली आहे. यातील एका फोटोत प्रियांकाचे कपाळ रक्ताने माखलेले दिसत आहे. या फोटोसोबत प्रियांकाने कोणते खरे आणि कोणते खोटे असे कॅप्शन लिहिली आहे.

तर दुसऱ्या एका फोटोत प्रियांकाने भुवयांमध्ये झालेली जखम खरी असल्याचे सांगितले आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहते हैराण झाले आहेत. ते वेगवेगळ्या कॉमेंन्टस करून प्रियांकाच्या तब्येतेची चौकशी करत आहेत.

प्रियांका नेहमी सोशल मीडियावर अक्टिव्ह असून ती फोटो शेअर करत असते. याआधी प्रियांकाने ‘टेक्स्ट फॉर यू’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. याशिवाय प्रियांका’मॅट्रिक्स ४’ चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button