देवमाणूस फेम रेश्मा आहे इतकी हॉट, जाणून घ्या रिअल लाईफविषयी | पुढारी

देवमाणूस फेम रेश्मा आहे इतकी हॉट, जाणून घ्या रिअल लाईफविषयी

पुढारी ऑनलाईन : देवमाणूस या लोकप्रिय मालिकेत रेश्मा या विवाहित महिलेची भूमिका साकारणी अभिनेत्री चर्चेत आहे. रेश्मा हिचे पात्र गायत्री बनसोडे हिने साकारले होते. या मालिकेतून चर्चेत आलेली गायत्री आता एका वेबसीरीजमुळे चर्चेत आलेली आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का? रेश्मा रिअल लाईफमध्ये कशी आहे? तर मग चला जाणून घेऊया तिच्यावषयी.

अधिक वाचा-

देवमाणूसमध्ये एका संसारिक स्त्रीची भूमिका तिने साकारली होती. डॉक्टर अजित कुमार देव हा तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवतो. आणि शेवटी ती डॉक्टरला आपली सुटका कर अशी सांगते. डॉक्टरने तिला सातासमुद्रापार न्यावे, अशी इच्छा व्यक्त करते. हे पाहून संतापलेला डॉक्टर अजित कुमार देव तिचा खून करतो.

अधिक वाचा-

हे झालं मालिकेचं कथानक. आता तिच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेऊया. गायत्री रिअल लाईफमध्ये खूप बोलते. ती इतकी बडबडते की, तिला स्वत: वर नियंत्रण ठेवावं लागतं की, आपल्याला कमी बोलायचं आहे.

गायत्री मराठवाड्याची आहे. तिचा जन्मही मराठवाड्यात झाला. पण, बालपण पिंपरीत गेलं. दहावीपर्य़ंतची शाळा पिंपरीतून झाल्यानंतर तिने फॅशन डिझायनिंग केलं. पुढे सेल्स डिपार्टमेंटमध्ये ती काम करायची. नंतर तिला मालिकेची ऑफर आली. तिने ती स्वीकारलीही. 

अभिनय शिकण्यासाठी तिला ललित केंद्राची मदत मिळाली. नाटकाविषयी तिने खूप वाचन केलं. अभिनयाविषयी खूप शिकायला मिळालं. तिच्या घरामध्ये कुठलाही सदस्य कला क्षेत्राशी संबंधित नाही.

तिने अनेक ऑडिशन दिले होते. आणि तिचं रिजेक्शनही झालं होतं. पण झी मराठीचं ऑडिशन दिलं आणि कॉल आला की, तिची देवमाणूससाठी निवड झालीय.

तिचं नाटकात काम करणं हे घरच्यांना कधीकाळी मान्य नव्हतं. पण, जेव्हा निवड झाली, तेव्हा घरच्यांनाही आनंद झाला. तिने अभिनयासाठी जॉब सोडला होता. तिचं पहिलं नाटक कमर्शिअल होतं.

किरण गायकवाड सोबत बॉन्डिंग

तिचा पहिला सहअभिनेता डॉक्टर म्हणजेच किरण गायकवाड होता. तो खूप पाठिंबा देणारा माणूस आहे. किरण खूप उत्साहित असतो. ती पहिल्यांदा भेटला तेव्हा त्याने थेट गायत्रीला बोलतं केलं होतं.

वेबसीरीजमुळे पुन्हा चर्चेत 

आता गायत्री ‘परीस’ सस्पेन्स थ्रीलर वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. ‘परीस’ ही वेबसीरिज अंधश्रद्धेवर आधारित आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फार अस्पष्ट अशी रेषा आहे. श्रद्धेची कधी अंधश्रद्धा होईल, हे सांगता येत नाही. ही वेबसीरिज ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर ३१ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

भारतातील ग्रामीण भागात आजही लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा दिसून येते. अशा सामाजिक, ज्वलंत आणि महत्त्‍वाच्‍या विषयावर वेबसीरिजची निर्मिती आहे.

हे ‘प्लॅनेट मराठी’चे धाडसी आणि तेवढेच कौतुकास्पद पाऊल म्हणावे लागेल.संवाद, पटकथा आणि दिग्दर्शन मयूर करंबळकर, कुलदीप दंगाडे आणि विशाल सांगले यांनी केले आहे. ‘प्लॅनेट मराठी’ आणि ‘वन कॅम प्रॅाडक्शन’ प्रस्तुत ‘परीस’ या वेबसीरिजची कथा मयूर करंबळकर यांची आहे.

सोन्याच्या लोभापोटी गावातील काही लोक परीसाच्या शोधात निघतात. त्यांचा हा शोध त्यांना कुठपर्यंत घेऊन जातो? त्यांना परीस मिळवण्यात यश येतं का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.

संवाद, दिग्दर्शन, छायाचित्रण,कलाकार यांची एक उत्तम भट्टी या वेब सीरीजमध्ये जमून आल्याचे ट्रेलरमधून दिसते. या वेबसीरिजचे छायाचित्रण सोपान पुरंदरे यांनी केले आहे.

हेदेखील वाचलंत का-

Back to top button