बंगाली इंडस्ट्रीत आतापर्यंत ३ अभिनेत्रींच्या आत्महत्या, फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करत आणखी एका अभिनेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

बंगाली इंडस्ट्रीत आतापर्यंत ३ अभिनेत्रींच्या आत्महत्या, फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करत आणखी एका अभिनेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न
Published on
Updated on

कोलकाता; पुढारी ऑनलाईन : बंगाली चित्रपट इंडस्ट्रीत आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. आता बंगाली अभिनेते सैबल भट्टाचार्य (Bengali actor Saibal Bhattacharya) यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे ते बचावले आहेत. एका वृत्तानुसार, धक्कादायक बाब म्हणजे सैबल भट्टाचार्य यांनी कोलकाता येथील त्यांच्या घरी धारदार वस्तूने स्वतःवर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला आणि हा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केला. ज्यामध्ये ते त्याच्या कसबा येथील घरी जखमी अवस्थेत दिसत आहेत. या फेसबुकवरील व्हिडिओने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

काही रिपोर्ट्सनुसार, भट्टाचार्य यांना कोलकाता नॅशनल मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपासून काम नसल्यामुळे सैबल नैराश्येत होते. पत्नी आणि सासूच्या त्रासामुळे त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचेही बोलले जात आहे. याआधी बंगाली चित्रपट इंडस्ट्रीतील ३ अभिनेत्रींनी आत्महत्या केल्या आहेत. सैबल बंगाली इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सैबल यांनी कथितरित्या आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी सोमवारी रात्री आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला. त्यात त्यांनी आपल्या या परिस्थितीला पत्नी आणि सासरच्या लोकांना दोष दिला आहे. मला हे पाऊल उचलण्याची वेळ आणली. यासाठी माझी पत्नी आणि सासू जबाबदार आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, सैबल यांनी नशेत स्वतःला जखमी करुन घेतले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

काही रिपोर्ट्सनुसार, सैबल यांना कुठे काम मिळत नव्हते. ज्यामुळे ते चिंतेत होते. यामुळेच ते डिप्रेशनमध्ये गेले होते. त्यांना नशा करण्याचे व्यसन जडले होते. ते अभिनयाबरोबरच स्क्रिप्ट आणि डायलॉग्स लिहिण्याचे काम करत होते. त्यांनी करीखेला, उडान तुबरी, मिठाई, प्रथम कादंबिनी अशा मालिकांमध्ये काम केले आहे.

बंगाली चित्रपट इंडस्ट्रीतून गेल्या काही दिवसांपासून वाईट बातम्या समोर येत आहेत. सैबल यांच्याआधी ३ अभिनेत्रींनी आत्महत्या केली आहे. बंदाली अभिनेत्री पल्लवी डे, बिधिशा जे मजूमदार आणि मंजूषा नियोगी यांनी आत्महत्या केल्या आहेत.

बंगाली सिनेमा जगतात सध्या दुर्देवी घटना पाहायला मिळताहेत. अभिनेत्री बिदिशा आणि पल्लवी डे यांनी याआधी आत्महत्या केल्या आहेत. त्यानंतर अभिनेत्री मॉडल मंजूषा नियोगीने आत्महत्या केली. तिचा मृतदेह तिच्या फ्लॅटवर लटकलेल्या अवस्थेत दिसून आला होता. अभिनेत्री पल्लवी डे आणि मॉडल बिदिशा डेचं निधन झालं होतं. फॅन्सना हा मोठा धक्का होता. या धक्क्यातून सावरत नाही तोपर्यंत आणखी एका बंगाली अभिनेत्रीच्या मृत्यूने बंगाल चित्रपट इंडस्ट्री हादरली होती. मंजूषाची मैत्रीण बिदिशाने आत्महत्या केली होती. बिदिशाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळाला होता. रिपोर्ट्सनुसार, पोलिसांना बिदिशाची सुसाईड नोटदेखील मिळाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news