'चीकू की मम्मी दूर की' : प्रोमोमध्ये मिथुन चक्रवर्ती यांची उपस्थिती - पुढारी

'चीकू की मम्मी दूर की' : प्रोमोमध्ये मिथुन चक्रवर्ती यांची उपस्थिती

मुंबई; पुढारी ऑनलाईन : स्टार प्लसचा आगामी शो चीकू की मम्मी दूर की चर्चेत आहे. या शोचा पहिल्या प्रोमोपासूनच सर्वांचे लक्ष्य वेधून घेत आहे. हा शो आई-मुलीचे प्रेमळ नाते दाखवतो. त्यांच्यामध्ये नृत्य हा सामायिक धागा आहे. ‘चीकू की मम्मी दूर की’च्या प्रोमोसाठी अभिनेते मिथुन चक्रवर्ती सहभागी होणार आहेत. मिथुन चक्रवर्ती यांची उपस्थिती या प्रोमोमध्ये दिसणार आहे.

डान्स शो असल्याने या प्रोमोची शोभा वाढवण्यासाठी चक्रवर्ती हे नाव योग्य आह. परिधि शर्मा आणि वैष्णवी प्रजापति या शोच्या मुख्य कलाकारांनादेखील शोसोबत जोडले जात आहे.

हा नवीनतम प्रोमो पाहिल्यानंतर कोणीही म्हणेल, वाह! क्या बात है!!

mithun chakraborty
मिथुन चक्रवर्ती

शोचे निर्माता गुल खान म्हणतात

शोचे निर्माता गुल खान म्हणतात की, “आज दर्शकांकडे कंटेंटसाठी अनेक विकल्प आहेत. हे लक्षात घेऊन दर्शकांच्या विकसित आवडीला कथानकामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतो. हेच आम्ही आमचा आगामी शो ‘चीकू की मम्मी दूर की’साठी देखील केले आहे.

हा एक सुंदर शो आहे. ज्यामध्ये आई आणि मुलीमधला त्वेष, भावना आणि एक प्रेमळ बंध दर्शवतो. जो परिस्थितीमुळे वेगळे झाल्यानंतरदेखील नृत्याच्या माध्यमातून एकमेकांसोबत जोडून ठेवतो.”

त्या म्हणाल्या, “चक्रवर्ती स्वतः एक लीजेंड आहेत. प्रसिद्ध होण्याआधी त्यांनी खूप कठिण परिस्थितीचा सामना केला आहे. कहाणीतील चीकू सारखीच आहे. यासाठी आम्हाला वाटले की, त्यांच्या उपस्थितीने वास्तविकतेशी जोडून घेता येईल. त्यांचे या प्रोमोसोबत जोडणे. खरोखर अद्भुत आहे. मिथुन सरांनी या शोमध्ये ज्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या खरोखर जादुई आहेत.”

हेही वाचलं का? 

Back to top button