रंग माझा वेगळा : दीपा-कार्तिकच्या मुलींचं नाव काय असेल? | पुढारी

रंग माझा वेगळा : दीपा-कार्तिकच्या मुलींचं नाव काय असेल?

मुंबई; पुढारी ऑनलाईन : स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा मालिकेत दीपा-कार्तिक यांच्या मुलींचा नामकरण सोहळा पाहायला मिळणार आहे. दीपा-कार्तिक यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला. असे असले तरी दोन्ही मुली दोन वेगळ्या घरात वाढत आहेत.

rang majha vegla barsa

अधिक वाचा-

कार्तिकने मुलींचं पितृत्व नाकारले. दीपाने एकटीने मुलीला वाढण्याचा निर्धार केला आहे. तर दीपाची खूण म्हणून सौंदर्याने दीपाची एक मुलगी आपल्या घरी वाढवण्याचं ठरवलं आहे. दोन्ही मुली जरी वेगवेगळ्या घरात वाढत आहे. पण, असे असले तरी योगायोगाने दोघींचा बारसे मात्र एकाच ठिकाणी होणार आहे.

अधिक वाचा- 

लेकींचं बारसं मंदिरात

देवावर श्रद्धा असणाऱ्या दीपाने आपल्या लेकींचं बारसे मंदिरात करायचं ठरवलं आहे. सौंदर्या इनामदारनेही बडेजाव न करता मंदिरातच बारसे करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही मुलींचं नावही ठरवण्यात आलं आहे. दोघांच्या नावावरुनच दीपिका आणि कार्तिकी असं नाव ठरवण्यात आलं आहे.

अधिक वाचा- 

आता या दोन चिमुकली त्या दोघांना पुन्हा एकत्र आणणार का? हे पाहणं उत्सुकतेचं असेल. ३० ऑगस्टच्या विशेष भागात हा नामकरण सोहळा पाहायला मिळणार आहे. त्यासाठी पाहायला विसरु नका रंग माझा वेगळा सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

हेदेखील वाचा- 

दीपाच्या रिअल लाईफविषयी माहिती आहे का?

या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे मुख्य भूमिकेत आहे. या मालिकेतील दिपा सावळी दाखवण्यात आली. खरं म्हणजे तिला मेकअप करून सावळ्या रंगाची तरुणी म्हणून दाखवण्यात आले आहे. पण, खऱ्याखुऱ्या आयुष्यात रेश्माचा लूक वेगळा आहे.

अभिनेत्री रेश्मा शिंदेने याआधी काही प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले आहे. ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेतून रेश्मा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘चाहूल’ या मालिकेतही तिने भूमिका साकारली होती.

बंध रेशमाचे, लगोरी, मैत्री रिटर्न्स, नंदा सौख्य भरे अशा लोकप्रिय मालिकांतून तिने अभिनय साकारला आहे. झी युवा तिने जितकी सुंदर तितकीच डेंजर या मालिकेत अंजलीची भूमिका साकरली होती. ३ जून २०१६ रोजी लालबागची राणी हा तिचा पहिला मराठी चित्रपट होता. देवा एक अंतरंगी हा २०१७ मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटातही दिसली होती.

Back to top button