सोनू सूदनं घेतली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट | पुढारी

सोनू सूदनं घेतली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : कोरोना संकटकाळात लोकांना मदत करुन चर्चेत आलेला अभिनेता सोनू सूद याने शुक्रवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

दिल्ली सरकारकडून लहान मुलांसाठी मार्गदर्शन योजना (मेंटर कार्यक्रम) राबविणार आहे. या योजनेसाठी सोनू सूद याला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनविण्यात आले असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया हेही उपस्थित होते.

जी कामे सरकार करु शकत नाहीत, ती कामे सोनू सूद करीत आहेत. पूर्ण देशासाठी ते प्रेरणास्त्रोत बनले आहेत, अशा शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी सोनु सूदचा यावेळी गौरव केला.

गरीब घरातील मुलांना मार्गदर्शन करणारे कोणीही नसते.

गरीब घरातील मुलांची खूप काही करण्याची इच्छा असते. मात्र, त्यांना मार्गदर्शन करणारे कोणीही नसते. अशा मुलांना मार्गदर्शन करण्याचे काम मेंटर कार्यक्रमाद्वारे केले जाईल, असेही ते म्हणाले.

यावेळी सूद यांनी दिल्लीच्या शिक्षण मॉडेलची स्तुती केली. मुलांना केवळ चांगले शिक्षण देणे महत्वाचे नसते. तर, त्यांना योग्य दिशा दाखविणे तितकेच आवश्यक असते. आपण मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी नेहेमी पुढाकार घेऊ, असे सूद यांनी नमूद केले.

हेही वाचलंत का? 

पाहा : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात नेमका वाद काय

Back to top button