'बाहूबली' प्रभास जेव्हा विना मेकअप फिरतो... | पुढारी

'बाहूबली' प्रभास जेव्हा विना मेकअप फिरतो...

मुंबई, पुढारी ऑनलाईन : ‘बाहूबली’ फेम बॉलिवूड अभिनेता प्रभास याचा आगामी ‘आदिपुरुष’ हा चित्रपट चाहत्याच्या भेटीस लवकरच येत आहे. सध्या सोशल मीडियावर प्रभास विना मेकअप स्पॉट झाला आहे.

प्रभास आगामी ‘आदिपुरुष’ हा चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या चित्रपटात प्रभासने प्रभू श्री रामची मुख्य भूमिका साकारली आहे. बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनने सीता, सनी सिंहने लक्ष्मण आणि सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट रामायणावर आधारित आहे.

याचदरम्यान प्रभासचा एक विना मेकअप लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत प्रभास एका गाडीत असून त्याने मेकअप केलेला नाही. हा फोटो प्रभास डान्स रिहर्सलमधून घरी परतत असतानाचा आहे. याशिवाय या फोटोत प्रभासचे वजनदेखील वाढल्याचं दिसत आहे.

प्रभासला केले ट्रोल

हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच प्रभास ट्रोल झाला आहे. यात एका नेटकऱ्यांने त्याला ‘दुधवाला काका’ म्हटले तर दुसऱ्याने त्याची तुलना ‘वडा पाव’शी केली आहे. याशिवाय तिसऱ्या एका नेटकऱ्याने प्रभासच्या या लूकवर नाराजी व्यक्त केली आहे. यात त्याने बाहुबली चित्रपटात प्रभास कसा दिसत होती आणि आता असा का दिसतोय? असे म्हटले आहे.

बाहुबली चित्रपटातील अभिनयाने प्रभासचे चाहते भारावून गेल होते. परंतु, सध्या व्हायरल झालेला लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरलेला नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे त्याला ट्रोल केल जात आहे.

याआदी प्रभास ‘साहो’ चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत दिसला होता. हा चित्रपट हिट झाला नाही. यानेतर प्रभासचा ‘बाहुबली’ चित्रपट खूपच गाजला. प्रभासच्या आगामी चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचलंत का? 

(photo : bollywoodpapand viralbhayani instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Pap (@bollywoodpap)

Back to top button