Singham-3 : रोहित शेट्टीची मोठी घोषणा, ‘सिंघम-३’चे शूटिंग होणार सुरू

rohit shetty and ajay devgan
rohit shetty and ajay devgan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनेक सुपरहिट चित्रपट घेऊन येणारा रोहिट शेट्टी नवा चित्रपट आणतोय. सिंघमच्या सीरीजचा तिसरा भाग तो घेऊन येतोय. यासंदर्भात त्याने एका मुलाखतीत सांगितले आहे की, सिंघम-३ चे (Singham-3) शूटिंग कोणत्या दिवशी सुरू होणार आहे. रोहित शेट्टीने नुकतेच 'सिंघम ३'चे शूटिंग सुरू करण्याबाबत सांगितले. एका मुलाखतीत रोहितने सांगितले की, या चित्रपटाची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. सध्या अजय देवगण आणि तो दोघेही त्यांच्या कामात बिझी आहेत. त्यामुळे पुढील वर्षी एप्रिलपासून चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल. रोहित शेट्टीने मल्टीस्टारर चित्रपटांबद्दलही संगितले आहे. (Singham-3)

एप्रिलमध्ये अजय देवगणसोबत 'सिंघम ३' चे शूटिंग सुरू करणार आहे. एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत रोहितने सांगितले की, "आम्ही सिंघम ३ वर काम सुरू केले आहे. बर्‍याच दिवसांनी मी सिंघम सिरीजचा चित्रपट बनवणार आहे. आम्ही पुढच्या वर्षी एप्रिलपासून चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहोत. सध्या अजय, मी माझ्या कामामुळे बिझी आहे. मी माझ्या आगामी चित्रपट सर्कसमध्येदेखील बिझी आहे. त्यामुळे एप्रिलपर्यंत आम्ही चित्रपटाचे शूटिंग सुरू करू. हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात मोठा कॉप युनिव्हर्स चित्रपट असेल."

तरुण कलाकारांनी मल्टीस्टारर चित्रपट करावेत : रोहित

मल्टीस्टारर चित्रपटाबद्दल बोलताना रोहित म्हणाला, "अजय देवघन आणि अक्षय कुमार हे जुन्या काळातील नायक आहेत ज्यांचा मल्टीस्टारर चित्रपट करण्यावर विश्वास आहे. रणवीरला माझ्यावर विश्वास आहे की मी त्याला योग्य भूमिका देईन. मल्टीस्टारर चित्रपट बनवणे, पण सर्व नवीन आणि तरुण कलाकारांनी मल्टीस्टारर चित्रपट करावेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news