राखी सावंत हिच्या मागे का लागली कुत्रे (video) - पुढारी

राखी सावंत हिच्या मागे का लागली कुत्रे (video)

मुंबई; पुढारी ऑनलाईन: बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. ती नेहमी आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. राखीला कुत्रे चावल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

नुकतेच राखी सावंत ‘बिग बॉस ओटीटी’च्या सेटवर खास गेस्ट म्हणून पोहोचली. यावेळी राखीने ‘संडे का वार’मध्ये करण जोहरसोबत स्टेज शेअर केला. याच दरम्यान राखीने एक सुंदर ड्रेस घालून एन्ट्री केली. हा ड्रेस घालून रस्त्याने जात असताना राखीच्या मागे दोन कुत्रे लागली आहेत. याशिवाय या व्हिडिओत राखीच्या जवळ दोन कुत्रे आल्याचे दिसत आहे.

हा व्हिडिओ राखी सावंतच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर झाला आहे. हा व्हिडिओ शेअर करत राखीने आपल्या मागे कुत्रे लागून त्यांनी चावा घेतल्याचे देखील म्हटले आहे.

आता कुत्र्यांना देखील चावू का?

व्हिडिओ कॅप्शनमध्ये राखीने लिहिले आहे की, ‘अरे, माझ्याबरोबर हे काय चालले आहे, मला अजून किती इंजेक्शन घ्यावे लागतील. याआधी कोरोना लस, डी 3 के आणि व्हिटॅमिन के? इंजेक्शन घेतली आहेत. आता मला कुत्र्याने चावले असल्याने मला आणखी इंजेक्शन घ्यावे लागणार आहेत. मी आता कुत्र्यांना देखील चावू का? असे तिने रागाने म्हटले आहे.

याआधीही राखीने स्पायरडमॅन सारख्या ड्रेस घालून बिग बॉसच्या घराबाहेर स्पॉट झाली होती. यावेळी तिने आपल्याला बिग बॉसच्या घरात एन्ट्री का दिली नाही, असा सवाल केला होता. यामुळे ती सोशल मीडियात चर्चेत आली होती.

यानंतर राखीने दिलेल्या एका मुलाखतीत हा सर्व प्रकार सांगितला आहे. यात तिने म्हटले आहे की, मी घरी विश्रांती घेत आहे. कारण मी घातलेला ड्रेस पाहून कुत्रे माझ्या मागे लागले आणि त्यांनी मला चावले आहे.

हेही वाचलं का?

Back to top button