Ruchira Jadhav : पतली कमर... तिरछी नजर... रुचिराच्या घायाळ अदा | पुढारी

Ruchira Jadhav : पतली कमर... तिरछी नजर... रुचिराच्या घायाळ अदा

पुढारी ऑनलाईन डेस्क : रुचिरा जाधव (Ruchira Jadhav) सोशल मीडियावरून नेहमीच सक्रिय असते. वेगवेगळे फोटो शेअर करत असते. यावेळी तिने फेंट बाॅटल ग्रीन साडीमधील फोटो नुकतेच शेअर केलेले आहेत.

रुचिरा ही मालिकेप्रमाणे खऱ्या आयुष्यातही तितकीच ग्लॅमरस आणि बोल्ड आहे. तिचे विविध पोज असलेल्या फोटोंवर चाहत्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आणि लाईक्स असतात.

ruchira jadhav

रुचिराने काही दिवसांपूर्वी एक हॉट फोटोशूट केलं होतं. त्याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यालाही चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

रुचिराच्या मादक अदा पाहून चाहते नेहमीच घायाळ होतात. तिच्या हिरव्या रंगाच्या साडीतील फोटो पाहून पुन्हा एकदा चाहते घायाळ झालेले आहेत.

ruchira jadhav

झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत मायाची भूमिका साकारणारी रुचिरा जाधव (Ruchira Jadhav) महाराष्ट्रातील घरांघरांमध्ये पोहोचली होती.

रुचिरा जाधनने कलर्स मराठीवरील ‘तुझ्यावाचून करमेना’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदापर्ण केलं. बे दुणे दहा, माझे पती सौभाग्यवती, प्रेम हे यांसारख्या अनेक मालिकांमध्येही तिने काम केले आहे.

लव्ह लफडे, सोबत या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे. माझ्या मित्राची गर्लफ्रेंड, बंच ऑफ रेड रोझेस या सारख्या वेबसिरीजमध्येही काम केलं आहे.

रुचिराने मालिकेप्रमाणे नाटकातही काम केले आहे. रुचिराने पराग विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. तर मुंबईतील के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, तिने पदवीचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे.

पहा व्हिडीओ : अभिनेता संतोष जुवेकरचं फेसबुक अकाऊंट हॅक

Back to top button