मुलगी झाली...दीपश्री माळी हिच्या घरी सोनपरीचे आगमन | पुढारी

मुलगी झाली...दीपश्री माळी हिच्या घरी सोनपरीचे आगमन

मुंबई; पुढारी ऑनलाईन : एक नवीन स्पर्श, नवीन साथ कायमची, एक विश्वास निरंतर राहणारा, एक प्रवास एकत्रीत……….नवीन विश्व…नवीन आयुष्य, आतून बाहेरून बदलुन टाकणारं…आणि….. शेवटपर्यंत हक्काने सतत कानावर ऐकू येणारा….. निशब्द करणारा एकच शब्द ” आई “. ही पोस्ट लिहिली आहे- मराठी अभिनेत्री दीपश्री माळी हिने. काल आमच्या घरी लक्ष्मी आली….. मुलगी झाली हो…अशा शब्दांत दीपश्री माळी हिने आनंद व्यक्त केलाय.

 

मातृत्व लाभणं, हे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाची आणि सुखद घटना आहे. जीवातून जीव येतो. पण, ही वाटते तितकी सोपी गोष्ट नसते. पण, तो आनंद मात्र वेगळाचं असतो.

 

असाच आनंद अभिनेत्री दीपश्रीला झालाय. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. यामध्‍ये तिने तिला आलेले अनुभव आणि आनंद व्यक्त केलाय.

काही दिवसांपूर्वी दीपश्रीने डोहाळ जेवणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तिने ती आई होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली होती.

तिने आपल्या बाळाच्या हाताचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या बाळाने दीपश्रीचे बोट पकडले आहे. या फोटोमध्ये या दोघींचे केवळ हात दिसत आहेत.

पण, तिने बाळाचा चेहरा दाखवलेला नाही. दीपश्रीचे बाळ कसे आहे, हे पाहण्यासाठी चाहत्यांनी उत्सुकता दर्शवली आहे. तसेच बाळाला आशीर्वाद आणि दीपश्रीला भरभरून कमेंट दिल्या जात आहे. चाहत्यांनी तिचे विविध पध्दतीने अभिनंदन केले आहे.

दीपश्रीने लिहिलंय-

“एक नवीन स्पर्श, नवीन साथ कायमची, एक विश्वास निरंतर राहणारा, एक प्रवास एकत्रीत नवीन विश्व नवीन आयुष्य, आतून बाहेरून बदलुन टाकणारं आणि शेवटपर्यंत हक्काने सतत कानावर ऐकू येणारा निःशब्द करणारा एकच शब्द “आई “.

काल आमच्या घरी लक्ष्मी आली मुलगी झाली हो Proud Mom.. Yesterday Blessed with Baby Girl” अशा शब्दांत तिने आपला आनंद व्यक्त केला आहे.

दीपश्रीने मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. अमेय माळीबरोबर तिचे लग्न झाले होते. झी युवा वाहिनीवरील ‘गर्ल्स हॉस्टेल’ ही तिची प्रसिध्द मालिका होती.

या मालिकेत तिने साकारलेली भूमिका लोकप्रिय ठरली होती. पुढे ‘एक घर मंतरलेलं’ या मालिकेतही तिने अभिनय केला होता.

हेही वाचलं का ?

 

View this post on Instagram

 

A post shared by Dipashree🌸 (@dipashreedmali)

 

View this post on Instagram

 

A post shared by Dipashree🌸 (@dipashreedmali)

Back to top button