मानिके मगे हिते : श्रीलंकन गाण्याचा इंटरनेटवर धूमाकुळ! (Video) | पुढारी

मानिके मगे हिते : श्रीलंकन गाण्याचा इंटरनेटवर धूमाकुळ! (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : आजकाल सोशल मीडियावर काय व्हायरल होईल याबद्दल काहीच सांगता येत नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक रातोरात स्टार बनतात. सध्या श्रीलंकन ​​गायिका योहानी डी सिल्वाचा मानिके मगे हिते गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक तिच्या गाण्याचे चाहते झाले आहेत.

संगीताला कोणत्याही भाषेची आवश्यकता नसते. संगीत ही आत्म्याच्या सर्वात शक्तिशाली निर्मितींपैकी एक आहे. सीमा, जात आणि लिंग ओलांडून सर्वांना एकत्र करण्यासाठी संगीतात शक्ती आहे. असंच श्रीलंकन ​​गायिका योहानी डी सिल्वाचा ‘मानिके मगे हिते’ हे गाणं आहे.

या गाण्याची खास गोष्ट म्हणजे हे गाणे हिंदी भाषेत नाही. तरीही लोक हे गाणे ऐकत आहेत. योहनीच्या ‘मानिके मगे हिते’ या गाण्याने तिला खूप लोकप्रिय केले आहे. हे गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. संगीत प्रेमींसह सामान्यांनाही भूरळ पडली आहे.

मानिके मगे हिते या गाण्याची निर्मीती जुलै २०२० मध्ये चमथ म्युझिक द्वारे करण्यात आली. हे सिंहली भाषेतील गाणे असून श्रीलंकन ​​गायिका योहानी हिने ते गायले असून तिला या गाण्यात रॅपर सतीशन याने सुंदर साथ दिली आहे. आता या सिंहली गाण्याने भारतात खळबळ उडवून दिली आहे आहे. अनेकांच्या वॉट्स ॲप, इन्स्टाग्राम, फेसबूकच्या स्टेटसला या गाण्याचा व्हिडिओ झळकत आहे.

प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्या इन्स्टाग्रामवर योहानीचे मानिके मगे हिते या गाण्याचा व्हिडिओ पोस्ट करून कौतुक केले आहे. बिग बी यांनी व्हिडिओसह कॅप्शनमध्ये लिहिले आहे की पार्ट २… तुम्ही काय केले… काय झाले!

बच्चन यांनी श्रीलंकन गाण्याचे खूप कौतुक केले आणि सांगितले की, त्यांनी रात्रभर हे गाणे ऐकले. त्यांनी लिहिले ‘हे ऐकणे थांबवणे अशक्य आहे. superb!

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

 

View this post on Instagram

 

A post shared by Yohani (@yohanimusic)

मे २०२१ मध्ये मानिके मगे हिते गाण्याचे कव्हर साँग लाँच झाले. यूट्यूबवर या गाण्याच्या व्हिडिओला गुरुवार, दि. २६ ऑगस्टपर्यंत ६१ मिलियन ह्युज मिळाले आहेत. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावर हे गाणे रेकॉर्ड मोडत आहे. ज्यामुळे निर्मात्यांनी गेल्या महिन्यात त्याचे तमिळ आणि मल्याळम व्हर्जन जारी केले. त्याचबरोबर या गाण्याची हिंदी आवृत्तीही आली आहे. जी प्रचंड गाजत आहे.

Back to top button