तारक मेहताची स्टायलिश बबीता हिचं नव्या अंदाजात कमबॅक (Photos) | पुढारी

तारक मेहताची स्टायलिश बबीता हिचं नव्या अंदाजात कमबॅक (Photos)

मुंबई; पुढारी ऑनलाईन : तारक मेहता या मालिकेची स्टायलिश बबीता हिचं कमबॅक झालं आहे. ती आता नव्या अंदाजात दिसणार आहे. अभिनेत्री मुनमुन दत्ता म्हणजेच बबीता तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये दिसली नव्हती.

 

तिने ही मालिका सोडली, अशी चर्चा सुरू झाल्या होत्या. मुनमुन आणि निर्मात्यांमध्ये वाद झाल्‍याचे वृत्त समोर आले होते; पण मुनमुन दत्ता आणि निर्मात्यांमधील मतभेद संपले आहेत. त्यामुळे ती पुन्हा शूटिंगवर आल्याचे समजते.

 

मुनमुन दत्ता या मालिकेत बबिता हे पात्र साकारत आहे. ती तारक मेहता या मालिकेत परतलीय. तिने शूटिंगलाही सुरूवात केल्याचे समजतेय.

 

मुनमुन सेटवर दाखल झाली. तेव्हा संपूर्ण टीम तिला पाहत होती. अनेकांना आश्चर्य देखील वाटले. मुनमुन दत्ता आणि निर्माता असित मोदी यांचे फोनवर बोलले. सर्व गोष्टी विसरून तिने पुन्हा आगमन केले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, निर्माते या आठवड्यात तिच्या कमबॅकच्या भागाचे प्रसारण करतील.

जेव्हा मुनमुन दत्ता अलीकडेच सेटवर दाखल झाली, तेव्हा संपूर्ण टीम तिला पाहून आश्चर्यचकित झाली. मुनमुन दत्ता आणि निर्माता असित मोदी यांनी फोनवर बोलून आणि गोष्टी विसरून आणि पुढे जाण्याविषयी बोलून प्रकरण मिटवले.

असे सांगितले जाते की, जेव्हापासून मुनमुन सेटवर परतली आहे. तेव्हापासून तिचा दृष्टीकोन बदलला आहे. आता ती सेटवर प्रत्येकाशी प्रेमाने बोलते, तिचे बदललेले वर्तन पाहून इतर कलाकारांना आश्चर्य वाटत आहे.

एका एपिसोडसाठी घेते इतके मानधन

आज मुनुमन एका एपिसोडसाठी ३५ ते ५० हजार रुपये घेते. मुनमुनला तिचे पहिले मानधन १२५ रुपये मिळाले होते. ६ वर्षाच्या वयात तिने अभिनयात डेब्यू केला होता.

मुनमुनचा जन्म १९८७ मध्ये पश्चिम बंगाल येथे दुर्गापूरमध्ये झाला होता.

हेही वाचलं का ?

Back to top button