मर्द को दर्द नहीं होता म्हणत अभिषेक बच्चन पोहोचला चेन्नईत | पुढारी

मर्द को दर्द नहीं होता म्हणत अभिषेक बच्चन पोहोचला चेन्नईत

मुंबई; पुढारी ऑनलाईन: बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याच्या प्रकृतीबाबत चिंतेत असलेल्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे.  मुंबईत त्याच्या हातावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर अभिषेक बच्चन पुन्हा एकदा त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी चेन्नईला पोहोचला आहे. या घटनेची माहिती सोशल मीडियावर देताना एक लांबलचक पोस्ट त्याने लिहिली आहे.

अभिषेक बच्चन याने आपल्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने लांबलचक पोस्ट लिहिली आहे. या फोटोत अभिषेकने निळ्या रंगाचे जरकिन परिधान केली असून त्याच्या हाताला प्लॅस्टर दिसत आहे.

अपघाताबाबत केला खुलासा

अभिषेकने अपघाताबाबत खुलासा करताना म्हटले आहे की, ‘गेल्या बुधवारी माझ्या नवीन चित्रपटाचे शूटिंग करत असताना माझा छोट्यासा अपघात झाला. या अपघातात माझा उजवा हात फ्रॅक्चर झाला. त्याच्यावर उपचार करण्यासाठी मला शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता होती. त्यामुळे मी तात्‍काळ मुंबईकडे रवाना झालो.’

यापुढे त्याने लिहिले की, ‘मुंबईतील घरी आल्यानंतर ताबोडतोब लिलावती रुग्णालयात माझ्यावर उपचार सुरू झाले आणि माझा हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता सर्व काही ठीक असून माझी तब्येतीत सुधारणा होत आहे. यामुळे मी पुन्हा कामाला लागलो असून, चेन्नईमध्ये आगामी चित्रपटाच्या शूटिंगला पोहोचलो आहे.’

‘शो मस्ट. गो ऑन ‘आणि माझे पापा म्हणाले होते की, मर्द को दर्द नहीं होता. थोड्या वेदना होत आहेत असे म्हणत अभिषेकने चाहत्यांचेही आभार मानले आहेत.

अभिषेकच्या या पोस्टवर निर्मीते करण जोहर, रितेश देशमुख, बॉबी देओलसह अनेक बॉलिवूड स्टार्सनी त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिषेकला आगामी ‘धूम ३’ या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान डाव्या हाताला दुखापत झाली होती. अभिषेक लवकरच आगामी ‘बॉस बि‍स्‍वास’या चित्रपटात दिसणार आहे.

या चित्रपटात अभिषेक बच्चनसोबत चित्रांगदा सिंह देखील दिसणार आहे. याशिवाय अभिषेक ‘दसवी’मध्येही दिसणार आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचा ‘द बिग बूल’ ओटीटीवर रिलीज झाला होता.

हेही वाचलं का?

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

Back to top button