रंग माझा वेगळा : दीपाच्या रिअल लाईफविषयी माहिती आहे का? | पुढारी

रंग माझा वेगळा : दीपाच्या रिअल लाईफविषयी माहिती आहे का?

पुढारी ऑनलाईन : रंग माझा वेगळा ही छोट्या पडद्यावरील मालिकेने अचानक नवे वळण घेतले. रंग माझा वेगळा या मालिकेत दीपा-कार्तिकच्या मुलांना आपले नाव देण्यास नकार दिला होता. त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. दीपा-रेश्मा शिंदे आपल्या संसारासाठी सर्व काही पणाला लावताना दिसतेय. पण, दीपा-रेश्मा शिंदे हिच्या रिअल लाईफविषयी माहिती आहे का?

 

या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे मुख्य भूमिकेत आहे. या मालिकेतील दिपा सावळी दाखवण्यात आली. खरं म्हणजे तिला मेकअप करून सावळ्या रंगाची तरुणी म्हणून दाखवण्यात आले आहे. पण, खऱ्याखुऱ्या आयुष्यात रेश्माचा लूक वेगळा आहे.

तिचा जन्म २७ मार्च, १९८७ रोजी मुंबईत झाला. शिक्षणही मुंबईत झाले.

 

अनेक मालिकांमध्ये काम

अभिनेत्री रेश्मा शिंदेने याआधी काही प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले आहे. ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेतून रेश्मा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘चाहूल’ या मालिकेतही तिने भूमिका साकारली होती.

बंध रेशमाचे, लगोरी, मैत्री रिटर्न्स, नंदा सौख्य भरे अशा लोकप्रिय मालिकांतून तिने अभिनय साकारला आहे. झी युवा तिने जितकी सुंदर तितकीच डेंजर या मालिकेत अंजलीची भूमिका साकरली होती.

३ जून २०१६ रोजी लालबागची राणी हा तिचा पहिला मराठी चित्रपट होता. देवा एक अंतरंगी हा २०१७ मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटातही दिसली होती.

चित्रपटातही अभिनय

रंग हे प्रेमाचे, एक अलबेला, लालबागची राणी अशा चित्रपटांमध्येही ती झळकली होती.

२०१० मध्ये महाराष्ट्राचे सुरस्टार रिॲलिटी शोमध्ये तिने एन्ट्री केली. बंध रेशमाचे या मालिकेच्या निर्मात्यांनी तिला यावेळी पहिल्यांदा पाहिलं होतं. त्यानंतर तिला हा मालिका मिळाली होती. ३ सप्टेंबर, २०१५ रोजी चला हवा येऊमध्येही रेश्मा दिसली होती.

मराठीसोबतच रेश्माने हिंदीतही काम केले आहे. रेश्माने ‘केसरी नंदन’ या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती.

अभिनेत्री रेश्मा सोशल मीडियावर सक्रीय असते. ती फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. नुकतेच तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

जोडीदार कोल्हापूरचा

२९ एप्रिल २०१२ रोजी तिने अभिजीत चौगलेसोबत लग्नगाठ बांधली. अभिजीत सिव्हील इंजिनिअर आहे. तो कोल्हापूरचा आहे.

हेही वाचलं का ?

 

View this post on Instagram

 

A post shared by Reshma Shinde (@reshmashinde02)

Back to top button