पुढारी ऑनलाईन डेस्क : 'जुळून येती रेशीम गाठी' या मालिकेमुळे प्रकाशझोतात आलेली मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सोशल मीडियावर सक्रिय असते. प्राजक्ता नवनवीन मराठमोळा साडी लूकने चाहत्यांनी भूरळ घालत असते. सध्या तिच्या प्रिंटेड साडीने सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर पांढऱ्या रंगाच्या प्रिंटेड साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. या साडीत प्राजक्ता कमालीची सुंदर आणि ग्लॅमरस दिसतेय. या फोटोतील खास म्हणजे, प्राजक्ताने प्रिंटेड साडीसोबत लाल रंगाचे सिव्हलेस ब्लाऊज परिधान केले आहे. तर साडीच्या पदरावर ब्लॅक रंगात सुंदर अनेक घरांच्या नक्षीदार डिझाईन दिसतेय. तर केसांचा अंबाडा, साजेशीर दागिने, लिपस्टिक आणि मेकअपने तिच्या सौंदर्यात भर घातली आहे.
प्राजक्ताने फोटोत किलर पोझ दिली आहे. यातील एका फोटोला पोझ देताना प्राजक्ता जिन्याच्यामध्ये उभी असून ब्लॅकलेस दिसतेय. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने 'एरी पवन ढूँढे किसे तेरा मन चलते चलते…♥️', 'आलसी रातें यूँ बीत जायें फिर चली जाऊँ तो ना मेरा क़ुसूर…?' 'तेरे नशे में हूँ मैं चूर जिस जोग कहे रम जाऊँ मैं. तेरा यह इश्क मेरा फितूर तू जो भी कहे बन जाऊँ मैं…'. असे लिहिले आहे. यातील विशेष म्हणजे, प्राजक्ताने परिधान केलेल्या ऑक्साईटचे दागिन्यांनी चारचॉद लावले आहेत. हे फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत.
हे फोटो शोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात एका युजर्सने 'खूपच सुंदर दिसतेस साडीत ❤️❤️', 'आरे कुठ ऐश्वर्या कोण ती करीना… तुला बघितलं की रामदास आठवले म्हणत्यात, ओ साथी रे तेरे बिना भी क्या जिना', 'तेरे नाम का दिवाना', 'काय डोळे ..काय नजर …काय अदा… ओक्के.. मदी सगळं…??', 'तू रुक जरा फरमाऊ मैं, ठेहेर तो जा दोहराऊ मैं', 'Looking hot beautiful as always?' असे म्हटले आहे.
दुसऱ्या एका युजर्सने 'Wow ?? absolutely beautiful look!', 'कसली भारी दिसतेस गं तू??', 'म्हारे शहर का मौसम बड़ा सुहाना लगे, 'मैं एक शाम चुरा लूँ अगर बुरा न लगे …?', 'Evergreen ❣️?', 'Nice pic ?', 'जबरदस्त', 'मनमोहक सौंदर्य ❤️❤️', 'अप्रतिम ❤️', 'सुंदर साडी तू तुझ्या अप्रतिम सौंदर्याने आणि मोहक लूकने साडीला अधिक सुंदर बनवलेस'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. याशिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट आमि फायरचे ईमोजींनी कॉमेन्टस बॉक्स भरलेला आहे. प्राजक्ता माळी नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते.
हेही वाचलंत का?