‘माझी तुझी रेशीमगाठ' मधील परीचे रिल्स पाहिलेत का? | पुढारी

‘माझी तुझी रेशीमगाठ' मधील परीचे रिल्स पाहिलेत का?

पुढारी ऑनलाईन डेस्क : झी मराठी’वर २३ ऑगस्ट २०२१ पासून सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही नवी मालिका सुरू झाली आहे. या मालिकेत चिमुरडीच्या भूमिकेत मायरा वैकुळ आहे. ही सोशल मीडियावर प्रसिध्द आहे. तिचे व्हिडिओ इस्टाग्रावर आणि यूट्युबवर लोकप्रिय आहेत. हे व्हिडिओ सध्या चांगलेच व्हायरल होत. आहेत.

मायराच्या मायरा कॉर्नर या यूट्युब चॅनलचे आतापर्यंत ९९.८ हजार सबस्क्रायबर झाले आहेत. काही दिवसातच ती एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडेल. लवकरच ती ‘सिल्व्हर बटण’ची मानकरी होईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaikul (@_world_of_myra_official)

माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे प्रमुख भूमिकेत आहेत. याआधी ‘अल्फा मराठी’च्या ‘आभाळमाया’, ‘झी मराठी’च्या ‘अवंतिका’, ‘दूरदर्शन’च्या ‘दामिनी’ आणि ‘झी युवा’च्या ‘गुलमोहर’ या टीव्ही मालिकांमध्ये श्रेयस तळपदे दिसला होता. आता बऱ्याच दिवसानंतर श्रेयस तळपदे टीव्ही मालिकांमध्ये दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaikul (@_world_of_myra_official)

मायराचे इस्टाग्रावरील रिल्स व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मधील तिचा अभिनय सर्वांना आवडला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. एवढ्या लहान वयात तिची अभिनयातील हुशारी अनेकांना आवडली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaikul (@_world_of_myra_official) 

हे ही वाचलत का :

ट्रेकर्सचा स्वर्ग हरिश्चंद्रगड कोकणकडा

Back to top button