Aishwarya Rai : ऐश्वर्या रायचा 'पोन्नियिन सेल्वन' सिनेमातील लूक खूपच सुंदर | पुढारी

Aishwarya Rai : ऐश्वर्या रायचा 'पोन्नियिन सेल्वन' सिनेमातील लूक खूपच सुंदर

मुंबई, पुढारी ऑनलाईन : बाॅलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) या दिवसांत सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. ती यावेळी मणि रत्नमच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटामध्ये काम करत आहे. हे शुटिंग मध्यप्रदेशच्या ओरछा येथे सुरू आहे. त्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत आहे.

या फोटोमध्ये ऐश्वर्याने कांजीवरम साडी परिधान केलेली आहे, तसेच भांगेत टीका लावलेला आहे. त्याचबरोबर खूप दागिन्यांनी सजलेली आहे. ऐश्वर्याचा हा लूक चाहत्यांना चांगलाच आवडलेला आहेत. या फिल्मच्या सेटवर अभिनेता प्रकाश राज, त्रिशा कृष्णन उपस्थित होते.
aishwarya rai
जयम रवि, कार्ति, ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता धूलिपाला दिसणार आहेत. शुटिंगच्या पहिल्या दिवशी ऐश्वर्याची मुलगी आराध्य स्पाॅट झाली होती. या चित्रपटात ऐश्वर्या नंदनी आणि मंदाकिनी देवीची भूमिका साकारणार आहेत. मात्र, सेटवरील ऐश्वर्याचा फोटो लीक झाला, ज्यावर लोकांच्या भरपूर प्रतिक्रिया येत आहेत.
‘पोन्नियिन सेल्वन’ हा चित्रपट कल्कि कृष्णमूर्ती यांच्या कादंबरीवर आधारित आहे. हा चित्रपट दोन भागांत रिलीज केला जाणार आहे. पहिला भाग हा २०२२ रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर टाकण्यात आलं होते. त्यावर PS-1 असंही लिहिलेलं होतं.
aishwarya rai
ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) ही ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटाबरोबरच अनुराग कश्यपच्या ‘गुलाब जामून’ या चित्रपटातही दिसणार आहे. फन्ने खान या चित्रपटात ऐश्वर्या राय शेवटची दिसून आली होती. ऐश्वर्या रायने जोधा अकबर, देवदास, रावण, अशा सुपरहीट चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केलेला होता.
अधिक वाचा…

Back to top button