फैजल खान म्हणतो, गर्लफ्रेंडपेक्षा बायकोचा खर्च जास्त | पुढारी

फैजल खान म्हणतो, गर्लफ्रेंडपेक्षा बायकोचा खर्च जास्त

मुंबई; पुढारी ऑनलाईन: बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा धाकटा भाऊ आणि अभिनेता फैजल खान बराच काळानंतर आगामी ‘फॅक्ट्री’ या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. फैजल खान याने आपण दुसरे लग्न का केले नाही? याबाबत खुलासा केला आहे.

फैजलने नुकतेच पार पडलेल्या एका मुलाखतीत तू अजून दुसरे लग्न का केले नाहीस? अशा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना त्‍याने मोकळेपणाने खूलासा केला.

दुर्दैवाने माझ्याकडे बायकोचा (पत्नी) खर्च उचलण्याइतके पैसे नसल्याचे त्‍याने म्‍हटले आहे. मला गर्लफ्रेंड देखील नाही, याशिवाय गर्लफ्रेंडपेक्षा बायकोचा खर्च खूपच जास्त असतो. त्यामुळे मी दुसऱ्या लग्नाचा विचार करू शकत नाही.

यापुढे जावून त्याने जर माझा एखादा चित्रपट हिट झाला तर मी मुलगी शोधायला लागेन, असेही त्‍यानं म्हटलं आहे.

यानंतर फैजलला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटाबद्दल विचारण्यात आले. यात त्याने ‘मी त्यांना कोणताही सल्ला देऊ शकत नाही. कारण माझे स्वतःचे लग्न टिकले नाही. दुसऱ्याच्या वैयक्तिक आयुष्यावर ट्रोल करणारा मी कोण आहे?. त्यांना माहित आहे की, त्यांच्यासाठी काय चांगले आहे.’

मुलाखतीत त्‍याने स्वतःच्या आणि आमिरच्या नात्याबद्दल सांगितले की, ‘आमच्यामध्ये सर्व काही ठीक आहे. एक व्यक्ती म्हणून मी माझे स्वतःचे निर्णय घेतो. मी एक दिग्दर्शक असून काय कारायचे ते मला माहीत आहे. या चित्रपटासाठी मला निर्मात्यांनी मदत केली आहे.’

आमिर खानवर केले होते गंभीर आरोप

काही वर्षांपूर्वी फैसलने आमिर खानवर घरात डाबूंन ठेवल्याचा गंभीर आरोपही केला होता. यावेळी तो ‘सीझाेफ्राेनिया’ नावाच्या आजाराने ग्रस्त होता. यानंतर त्याने कुटुंबियानी जबरदस्तीने औषधे देवून मानसिक रुग्ण बनविल्याचा गंभीर आरोप केला होता.

याशिवाय फैजलने आमिर खानने आपल्या संपत्तीमधील पैसे बळकावू पाहत असल्याचा आरोप केला होता.

एवढेच नाही तर, त्याने ‘फॅक्ट्री’ चित्रपटासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची मदत केली नसल्याचा आरोप केला आहे.

फैजलच्या आगामी ‘फॅक्ट्री’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात फैजलने मुख्य भूमिकेसोबत दिग्दर्शन केले आहे. ‘फॅक्ट्री’ चित्रपट ३ सप्टेंबर २०२१ रोजी रिलीज होणार आहे.

याआधी फैजलने ‘मेला’, ‘चिनार दास्तान’, ‘जो जिता वही सिकंदर’ या चित्रपटात काम केले होते. परंतु, त्याला फारसे यश मिळाले नाही. बॉलिवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्युनंतर फैजल खानने आपण नैराशेत गेल्याचा खुलासा केला होता.

हेही वाचलं का? 

Back to top button