केतकी माटेगावकर हिच्या नव्या गाण्याची पडेल भुरळ | पुढारी

केतकी माटेगावकर हिच्या नव्या गाण्याची पडेल भुरळ

पुढारी ऑनलाईन : गायिका, अभिनेत्री केतकी माटेगावकर हिचे नवे गाणे संगीत रसिकांच्या भेटीला येत आहे. केतकी माटेगावकर हिच्या गाण्याचे चांदणे तुझ्यावरी असे बोल आहेत. ४ सप्टेंबरला हे गाणे भेटीला येईल. तशी पोस्ट केतकीने फेसबूकवर लिहिली आहे. सोबतचं या व्हिडिओची झलकदेखील तिने शेअर केली आहे.

अधिक वाचा-

केतकीने लिहिलंय- 

चांदणे तुझ्यावरी | 4th September ला येतोय. स्वत: गायिका केतकी माटेगावकरने हे गाणे गायलंय. धवल चंदवाडकर यांचे संगीत आहे. तर कल्याणी पई यांचे गीत आहे.

वयाच्या चौथ्या वर्षापासून केतकीने संगीतक्षेत्रात पदार्पण केलं होतं. ती एक गायिका असण्यासोबतच उत्तम अभिनेत्रीही आहे.‘शाळा’ या चित्रपटातून या अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.

आरोही, तानी, काकस्पर्श, टाईमपास यासारखे चित्रपट तिच्या नावावर आहेत. टाईमपासमध्ये तिने दगडूच्या प्राजक्ताची भूमिका साकारली होती.

काकस्पर्शसाठी तिला ‘मिफ्ता अवॉर्ड्स २०१२’मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. शाळासाठी तिला ‘फिल्मफेअर ॲवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले.

अधिक वाचा-

केतकी माटेगावकरचा जन्म २२ फेब्रुवारी, १९९४ मध्ये नागपूर येथे झाला. टाईमपास’, ‘शाळा’, ‘काकस्पर्श’ यासारखे हिट चित्रपट करून आपली एक वेगळी ओळख तिने मराठी सिनेसृष्टीत निर्माण केली.

‘सारेगमप लिटल चॅम्प’मध्ये ती सहभागी झाली होती. पुढे तिने मराठी अभिनय क्षेत्रात आली. केतकीचा तानी हा आठवणीतला चित्रपट आहे.

अधिक वाचा-

तिच्या शाळा चित्रपटातील शिरोडकरची भूमिका ही प्रेक्षकांच्या मनात घर करून केली. यानंतर टाईमपासमधील प्राजक्ताच्या भूमिकेने तिला सिनेसृष्टीत अधिक उंचीवर नेले.

केतकीची आई सुवर्णा माटेगांवकर प्रसिद्ध गायिका आहेत. वडील उत्तम हर्मोनियम वादक आहेत. तिचा मोठा चाहता वर्ग असल्याचं पाहायला मिळतो. केतकीच्या सौंदर्यानेही चाहत्यांना भुरळ घातली आहे.

हेदेखील वाचा- 

Back to top button