RHTDM मध्ये बॅकग्राऊंड डान्सर होती डेजी शाह, आता इतकी बदलली | पुढारी

RHTDM मध्ये बॅकग्राऊंड डान्सर होती डेजी शाह, आता इतकी बदलली

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूडमध्ये काही अभिनेत्रींचा गॉडफादर सलमान खान आहे. सलमानने अनेक अभिनेत्रींना ब्रेक दिला. असाच ब्रेक त्याने डेजी शाह हिलादेखील दिला होता. डेजी शाह हिचा आज २५ ऑगस्ट रोजी ३७ वा वाढदिवस आहे.

१९८४ मध्ये डेजीचा जन्म एका गुजराती कुटुंबात झाला. तिचं बालपण मुंबईत गेलं. डेजी एक बॅकग्राउंड डान्सर नंतर कोरियोग्राफर झाली. पण, ती सुपरस्टार सलमान खानची हिरोईन कशी झाली? माहिती आहे का?

डेजीने सलमान खानचा चित्रपट ‘जय हो’मधून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत होती. डेजीला बॉलीवूडची हिरोईन बनवण्यात सलमान खानचं आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खानने ‘बॉडीगार्ड’साठी डेजीला ऑफर दिली होती. पण, डेजीने ती ऑफर नाकारली होती. हा चित्रपट हिट ठरला. २०११ मध्ये कन्नड चित्रपट ‘बॉडीगार्ड’मध्ये डेजी मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत होती. पुढे सलमानने ‘जय हो’साठी पुन्हा तिला ऑफर दिली. यातील भूमिका करण्यासाठी ती तयार झाली.

जय हो सलमानचा लहान भाऊ सोहेल खानने दिग्दर्शित केला होता. सलमानसोबत अभिनय करूनदेखील डेजीला इंडस्ट्रीत म्हणावे तसे यश मिळाले नाही.

डेजी जेव्हा १० वीत शिकत होती. तेव्हा तिने मुंबईत मिस डोंबिवली स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेत तिने मिस फोटोजेनिकचा किताब मिळवला होता.

डेजीला डान्स कोरिओग्राफीमध्ये आवड होती. तिने कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्याकडून ट्रेनिंग घेतले. ३ वर्षांपर्यंत तिने चित्रपटांमध्ये सहाय्यक म्हणून काम केले. जमीन, खाकी चित्रपटात तिने गणेश आचार्य यांची असिस्टेंट म्हणून काम केलं.

‘रहना है तेरे दिल में’, ‘तेरे नाम’मध्ये ती बॅकग्राउंड डान्सर म्हणून डान्स केला होता. तेरे नाम मधील गाणं ‘ओ जाना’ आणि ‘लगन लगी’ मध्ये डेजी सलमानच्या मागे डान्‍स करताना दिसली होती.

डेजीने मॉडलिंग केलं. अनेक फोटोशूट्स आणि प्रिंट जाहिरातींमध्ये तिने काम केलं.

तिने अनेक कन्नड, तमिळ आणि मल्याळम भाषेत काम केलं. परंतु, सलमानच्या जय हो या चित्रपटातून तिला मोठा ब्रेक मिळाला. आणि ती रातोरात चर्चेत आली.

डेजीचा शेवटतचा चित्रपट २०१८ मधील ‘रेस ३’ होता. पण, यातील खराब अभिनयामुळे तिला ट्रोल व्हावं लागलं होतं.

 

डेजीला ओळखणं देखील कठीण

आता २ वर्षांनंतर डेजीला ओळखणं देखील कठीण झालं आहे. तिचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही. तिच्या इन्स्टाग्रामवर तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती डेजीचं आहे का? असा प्रश्न पडतोय.

इतक्या वर्षात ती दिसायलाही सुंदर आणि स्लिम झाली आहे. एकेकाळी गोलमटोल दिसणाऱ्या डेजीचे हे फोटो पाहाच-

 

View this post on Instagram

 

A post shared by Daisy (@shahdaisy)

 

View this post on Instagram

 

A post shared by Daisy (@shahdaisy)

 

View this post on Instagram

 

A post shared by Daisy (@shahdaisy)

Back to top button