प्रिया प्रकाश वारियर : पारंपरिक ड्रेसमध्‍ये बोल्ड लूक | पुढारी

प्रिया प्रकाश वारियर : पारंपरिक ड्रेसमध्‍ये बोल्ड लूक

मुंबई; पुढारी ऑनलाईन: काही सेकंदात डोळा मारतानाच्या व्हिडिओने बॉलिवूड अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर हिने सोशल मीडियात धुमाकूळ घातला होता. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असून आपले हॉट फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सध्या प्रियाने असेच एक हटके फोटोशूट केले आहे.

प्रिया प्रकाश वारियर हिने नुकतेच केरळमधील ओणमच्या सण साजरा केला. यावेळी प्रियाने पांढऱ्या आणि नारंगी रंगाचा पोलका परिधान केला हाेता. या फोटोत ती पारंपरिक आणि बोल्ड अवतारात खूपच ग्लॅमरस दिसत आहे. प्रियाने हे फोटो आपल्या इंन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही फोटोंमध्ये प्रियाने आपल्या हातात फुलांचा गजरा पकडून उभी असल्याचे दिसते. काही फोटोत प्रिया अगदी मादक नजरेने पोझ देताना दिसत आहे. प्रियाचे हे फोटो चाहत्यांना भूरळ घालत आहेत.

प्रियाचे इंन्टाग्राम अकाउंटवर ७० लाख ७२ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

याआधीही प्रियाने बोल्ड, ग्लॅमरस आणि साडीतील हटके फोटोशूट केले होते. या फोटोतही ती खूपच सुंदर दिसत होती.

ओणम हा केरळमधील महत्‍वाचा सण असून ताे एकूण १० दिवसांचा असतो. हा सण फक्त केरळ राज्यातच नव्हे तर दक्षिण भारतात मोठ्या थाटामाटात साजरा हाेता.

प्रिया तमिळ ‘ओरु अदार लव’ आणि तेलगू ‘इश्क: नॉट अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटात दिसली हाेती.

साडीवर प्रियाचा भन्नाट डान्स

याआधी प्रियाने साडीमध्ये एका मल्याळम भाषेतील गाण्यावर डान्स करतानी दिसली होती. वेगवेगळे हावभाव करत तिने डान्स केला होता.

प्रियाचा साडीमधील डान्स नेटकऱ्यांना चांगलाच आवडला होता. या व्हिडीओला ३ लाख ९५ हजारांहून अधिक चाहत्यांनी कॉमेन्टस केल्या होत्या. नेटकऱ्यांना हा व्हिडिओ आवडल्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता.

Back to top button