‘ख्वाडा’, ‘बबन’नंतर भाऊराव कर्‍हाडेंचा ‘टीडीएम’ येतोय | पुढारी

‘ख्वाडा’, ‘बबन’नंतर भाऊराव कर्‍हाडेंचा ‘टीडीएम’ येतोय

पुढारी ऑनलाईन डेस्क  : ‘ख्वाडा’ या आपल्या पहिल्याच चित्रपटातून सिनेप्रेमींचे लक्ष वेधून घेत राष्ट्रीय पुरस्कार पटकावणार्‍या भाऊराव नानासाहेब कर्‍हाडे यांचा ‘बबन’ हा चित्रपटही यशस्वी ठरला. आता भाऊराव यांनी कॉमेडी चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. या आगामी चित्रपटाचे नाव आहे ‘टीडीएम’. या सिनेमाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

पोस्टरवरील पाठमोरा कलाकार नेमका कोण आहे, याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. चित्रपटाची कथा, संवाद, स्क्रीनप्लेची जबाबदारी बी. देवकाते आणि भाऊराव यांची आहे. ग्रामीण, वास्तविक जीवनातील समस्येवर सिनेमाच्या माध्यमातून भाष्य करणारा दिग्दर्शक म्हणून भाऊराव यांची ओळख आहे. ‘हैद्राबाद कस्टडी’ हा त्यांचा सिनेमाही 2023 ला मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांना ग्रामीण, वास्तविक जीवनातील समस्येवर चित्रपटाच्या माध्यमातून भाष्य करणारे दिग्दर्शक म्हणून सिनेसृष्टीत ओळखले जाते. ‘ख्वाडा’ या पहिल्याच चित्रपटातून त्यांनी चित्रपटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर त्यांचा बबन हा चित्रपटही सुपरहिट ठरला होता. यानंतर आता भाऊराव एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘टीडीएम’ असे या चित्रपटाचे नाव असून नुकतंच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. हा चित्रपट कॉमेडी जॉनर प्रकारातील असणार आहे.

‘चित्राक्ष फिल्म्स’ आणि स्माईल स्टोन स्टुडिओ’ प्रस्तुत ‘टीडीएम’ या कॉमेडी जॉनरच्या चित्रपटाच्या निर्मितीची धुराही स्वतः भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी सांभाळली असून, चित्रपटाची कथा, संवाद, स्क्रीनप्लेची जबाबदारी बी. देवकाते आणि भाऊरावांनी सांभाळली आहे. या चित्रपटाच्या संगीताची बाजू वैभव शिरोळे आणि ओमकारस्वरूप बागडे यांनी पाहिली आहे.

 

Back to top button