मोनालिसा बागल करणार 'रावरंभा' ऐतिहासिक चित्रपट | पुढारी

मोनालिसा बागल करणार 'रावरंभा' ऐतिहासिक चित्रपट

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री मोनालिसा बागल ‘रावरंभा’ ऐतिहासिक चित्रपट करणार आहे. मोनालिसा बागलच्या या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले होते. तेव्हापासून या चित्रपटाविषयी अनेकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती.

तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातील पवित्र देवस्थान रायरेश्वर होय. पांडवकालीन जागृत देवस्थान. भोर तालुक्यातील,आणि पुणे जिल्ह्यातील हे स्थान आहे.

साताऱ्यातील वाईपासून जवळच किल्ले रायरेश्वराचे स्थान. याच किल्ले रायरेश्वरावर शंभू महादेवाच्या साक्षीने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. बाल शिवाजींनी आपल्या १२ सवंगड्यांसह स्वराज्य स्थापनेची शपथ २६ एप्रिल १६४५ रोजी घेतली.

हे सांगण्याचे विशेष कारण म्हणजे आगामी मराठी चित्रपट “रावरंभा.” आपल्या ऐतिहासिक शाहूनगरीतील पहिला ऐतिहासिक चित्रपट. पटकथा संवाद लेखन प्रताप दादा गंगावणे यांचे आहेत. दिग्दर्शक अनुपजी जगदाळे हे आहेत.

सातारा शहरातील शशिकांत शिला भाऊसाहेब पवार हे चित्रपटसृष्टीत येत आहेत. त्यांच्या शशिकांत पवार प्रोडकशन्स या निर्मिती संस्थेद्वारे ते या क्षेत्रात पदार्पण करत आहेत.

मोनालिसा बागल प्रमुख भूमिकेत

चित्रपटात अभिनेत्री मोनालिसा बागल प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा स्क्रिप्ट पूजन सोहळा पाहर पडला. हा सोहळा शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या पावन भूमीत संपन्न झाला.

याप्रसंगी प्रताप दादा गंगावणे, अनुपजी जगदाळे, अभिनेत्री मोनालिसा बागल, इतिहासकार भोरचे श्री दत्ताजी जगदाळे उपस्थित होते. उद्योजक मंगेश दादा जाधव, अभिनेत्री अश्विनी बागल, ‘धर्मवीर युवा मंच’चे अध्यक्ष प्रशांत नलावडे, निर्माते शशिकांत शिला भाऊसाहेब पवार यांची उपस्थिती होती.

चित्रपटात नामवंत कलाकार आहेत. त्यांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहेत. लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण चालू होत आहे.

हेदेखील वाचलंत का –

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Monalisa Bagal (@monalisabagal)

 

View this post on Instagram

 

A post shared by Monalisa Bagal (@monalisabagal)

 

View this post on Instagram

 

A post shared by Monalisa Bagal (@monalisabagal)

Back to top button