अभिषेक बच्चन लिलावती रुग्णालयात दाखल | पुढारी

अभिषेक बच्चन लिलावती रुग्णालयात दाखल

मुंबई; पुढारी ऑनलाईन: बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याला चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दुखापत झाली आहे. यानंतर अभिषेक बच्चन याला तातडीने मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. अभिषेकला ही दुखापत कशी झाली? याबाबत अधिकृत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

अभिषेक बच्चन आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी होता. शूटिंग दरम्यान त्याच्या हाताला दुखापत झाली आणि त्याला मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, बच्चन कुटुंबियांकडून या माहितीला कोणताही दुजोरा दिला गेला नाही.

यानंतर अभिषेकचे वडील बिग बी अमिताभ बच्चन आणि बहीण श्वेता बच्चन मुंबईतील लिलावती रुग्णालयात पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांपासून आगामी ‘पोन्नयिन सेलवन’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये बिझी असणारी बॉलिवूड ऐश्वर्या राय बच्चन पतीला पाहण्यासाठी मुंबईत पोहोचली आहे. ऐश्वर्या प्रायव्‍हेट जेटने मुंबईत आल्याची माहिती समजली आहे.

विरल भयानी इंन्स्टाग्रामवर अमिताभ आणि श्वेता यांचा लिलावती रुग्णालया बाहेरील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अभिषेक याआधीही धूम 3 चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती. अभिषेक लवकरच ‘बॉस बिस्वास’ आणि ‘दसवीं’ या चित्रपटात दिसणार आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचा ‘द बिग बूल’ ओटीटीवर रिलीज झाला होता.

हेही वाचलंत का? 

(photo : viralbhayani instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

पाहा ; कला क्षेत्रात अनेक चांगल्या संधी : लेखक अरविंद जगताप 

Back to top button