Bollywood News : अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची कॅन्सरवर मात - पुढारी

Bollywood News : अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची कॅन्सरवर मात

मुंबई, पुढारी ऑनलाईन : मनोरंजन विश्वातील (Bollywood News) प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर मूत्राशयाचा कॅन्सर झालेला होता. त्यामुळे एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाख करण्यात आले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून आता त्यांची प्रकृती ठिक आहे.

काही दिवसांपूर्वी महेश मांजरेकर यांना मूत्राशयाचा कर्करोग असल्याचं निदान झालं. त्यामुळे तातडीने शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आलं. महेश यांच्यावर शस्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. महेश यांना इस्पितळातून डिस्चार्ज मिळाला असून ते सध्या राहत्या घरी विश्रांती घेत आहेत.
प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर यांनी मराठी सह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने आणि दिग्दर्शनाने प्रेक्षकांचं मनात घर केलं आहे. ‘वॉन्टेड’, ‘रेडी’, ‘दबंग’, ‘जिंदा’, ‘मुसाफिर’ आणि ‘कांटे’ यारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये (Bollywood News) त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
मोठ्या पडद्यावर काम करत असताना छोट्या पडद्यावरही महेश यांनी ‘बिग बॉस मराठी’चं सूत्रसंचालन केलेलं आहे. लवकरच ते ‘बिग बॉस मराठी’ सीजन ३ चं सूत्रसंचालन करताना देखील दिसणार आहेत. यासोबतच वाढदिवसाच्या निमित्ताने महेश यांनी ‘व्हाइट’ या चित्रपटाची देखील घोषणा केली आहे. याशिवाय महेश स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ याचीही निर्मिती करत आहेत.

Back to top button