शिल्पा शेट्टी योग व्हिडिओ शेअर करुन म्हणते ‘ही सिद्ध करण्याची वेळ’ | पुढारी

शिल्पा शेट्टी योग व्हिडिओ शेअर करुन म्हणते 'ही सिद्ध करण्याची वेळ'

मुंबई : पुढारी ऑनलाईन

शिल्पा शेट्टी पती राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. राज कुंद्राला मुबंई पोलिसांनी पॉर्नोग्राफी व्हिडिओ रॅकेट चावल्या प्रकरणी अटक केली आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र या प्रकरणामुळे प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या प्रतिमेस चांगलाच तडा गेला. तिच्यावरही फसवणुकीचे आरोप होत आहेत.

पण, शिल्पा शेट्टी या सर्व प्रकरणातून आता बाहेर पडण्याची धडपड करत आहे. अनेक दिवसानंतर शिल्पाने आपल्या दैनंदिन कामाला सुरुवात केली. ती सुपर डान्सरच्या सेटवर पोहचली. अनेक दिवसानंतर कॅमेऱ्याला सामोरी गेल्यानंतर शिल्पा शेट्टीला आपल्या भावना अनावर झाल्या होत्या.

दरम्यान, शिल्पा शेट्टीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत शिल्पा शेट्टी योगासनाची विविध आसने करताना दिसत आहे. या व्हिडिओला तिने, ‘तुम्हाला तुमच्या स्वतःचाच योद्धा व्हायचं आहे, स्वतःचे जीवन सकारात्मक स्वरुपात बदलण्यासाठी तुम्ही एकटे पुरेसे आहात. आयुष्य आनंदी असो वा दुःखी मी कायम योगा करतेच. योगा तुम्हाला सकारात्मक राहण्यास मदत करते. एवढेच नाही तुम्हाला शक्तीशाली बनवते. आयुष्यात संतुलन राखण्यासाठी याची मदत होते.’ असे कॅप्शन दिले.

वीरभ्रद्रासनाने होतील तुमच्या मांडीचे स्नायू बळकट

शिल्पा शेट्टी आपल्या कॅप्शनमध्ये पुढे म्हणते, ‘वीरभद्रासन, मलासन आणि डायनॅमिक हीप ही आसने आपल्या दिनक्रमात सामिल करुन घ्या. याचे तुम्हाला अनेक फायदे होतील. वीरभद्रासन तुमच्या मांडीचे दंडाचे स्नायू बळकट करेल. तसेच या आसनाची एकाग्रता आणि संतुलन राखण्यासाठीही मदत होईल.’

डायनामिक हीप कंबर करेल मजबूत

‘याचबरोबर मलासन हीप आणि कमरेसाठी उपयुक्त आहे. याचबरोबर सांदे दुखीही जास्त बळावत नाही. तर डायनॅमिक हीप हे हीप फ्लेक्सर्सला मजबुती देते. याचबरोबर खालील भागातील दुखापतीही कमी करते. अथर्ववेद शांती सूक्त किंवा शांतीसाठीचा मंत्र मन, शरीर आणि आत्मशांतीसाठी उपयुक्त आहे. आसने हळूहळू सुरु करा आणि एका आसनातून दुसऱ्या आसनाकडे वळा. ही सिद्ध करण्याची वेळ हे योगानेच शक्य होणार आहे.’

राज कुंद्राला अटक झाल्यानंतर शिल्पा शेट्टी सोशल मीडियापासून लांब राहिली होती. पण, आता तिने आपले सामन्य जीवन पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच तिने सुपर डान्सरच्या स्टेजवर पुन्हा हजेरी लावली. ती या शोमध्ये एक परिक्षक आहे. यावेळी सहभागांनी स्पर्धकांनी शिल्पाचे जोरदार स्वागत केले. यामुळे ती भावूक झाली.

हेही वाचले का? 

पाहा व्हिडिओ : मोहरम निमित्त बाबुजमाल दर्ग्यातील खत्तलरात्र

Back to top button