संस्कारी सून 'गोपी बहू' : देवोलिना भट्टाचार्जी हिचा ग्लॅमरस जलवा (Video) - पुढारी

संस्कारी सून 'गोपी बहू' : देवोलिना भट्टाचार्जी हिचा ग्लॅमरस जलवा (Video)

पुढारी ऑनलाईन : छोट्या पडद्यावरील संस्कारी सून ‘गोपी बहू’ देवोलिना भट्टाचार्जी हिचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. देवोलिना भट्टाचार्जी  हिने रिल्स करून आपला ग्लॅमरस जलवा दाखवला आहे.

अधिक वाचा –

देवोलिना सोशल मीडियावर नेहमी ॲक्टिव्ह राहते. देवोलिनाने टीव्ही मालिका ‘साथ निभाना साथिया’मधून छोट्या पडद्यावर एंट्री घेतली होती. या मालिकेत तिने गोपी बहूची भूमिका साकारली होती.

अधिक वाचा –

या मालिकेत तिची एक संस्कारी सून म्हणूम ओळख निर्माण झाली होती. पण, रिअल लाईफमध्ये सोशल मीडियावर तिचा बोल्ड आणि हॉट अंदाज दिसत आहे.

अधिक वाचा –

देवोलिनाने सोशल मीडियावर आपले ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती पुलाच्या किनारे उभारून एन्जॉय करताना दिसत आहे.

नाशिक व्ह्केशनवर देवोलिना

देवोलीनाने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो नाशिक व्हेकेशनचे आहेत. २२ ऑगस्टला तिने तिचा ३६ वा वाढदिवस साजरा केला होत. नाशिकमध्ये तिने आपला वाढदिवस साजरा केला. तेथून तिने ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

तिने फोटोला कॅप्शन लिहिले आहेत. ‘And yes its indeed a special day. ❣️Happy wala Birthday to me’.
चाहत्यांनी तिला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

देवोलिनाचा करिअर

अभिनेत्री देवोलिनाने स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका ‘साथ निभाना साथिया’मध्ये अभिनय केला होता. यामध्ये तिने गोपी बहूचे पात्र साकारले होते. य़ा मालिकेतून तिने आपल्या करिअरला सुरूवात केली होती.

ती बिग बॉस -१३ मध्येही दिसली होती. बिग बॉसमधून तिला अधिक लोकप्रियता मिळाली होती. सध्या ती ‘साथ निभाना साथिया’ सीझन-२ मध्ये गोपीचे पात्र साकारत आहे.

सोशल मीडियावर तिचा डान्स आणि सिंगिंग व्हिडिओ पसंत केले जात आहेत.

हेदेखील वाचा-

 

Back to top button