आई कुठे काय करते : रुपाली भोसले हिला तायडे म्हणणारा 'तो' कोण | पुढारी

आई कुठे काय करते : रुपाली भोसले हिला तायडे म्हणणारा 'तो' कोण

मुंबई; पुढारी ऑनलाईन : आई कुठे काय करते या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत रुपाली भोसले आहे. रुपाली भोसले हिला तायडे म्हणणारा ‘तो’ कोण आहे? तुम्हाला माहिती आहे का?

अधिक वाचा- 

काही नाती ही रक्ताच्या नात्याच्या पलिकडची असतात. स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिका पाहायला मिळतेय. यामध्ये अभिनेत्री रुपाली संजनाच्या भूमिकेत आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने तिने सेटवरच्या तिच्या भावाविषयी सांगितलं.

अधिक वाचा-

rupali bhosle
रुपाली भोसले आणि संकेत बरे

रुपाली म्हणते-

ती म्हणते-आई कुठे काय करते मालिकेच्या टीममध्ये सामील होऊन मला एक वर्ष झालंय. बरोबच एक वर्षापूर्वी माझी संकेतशी भेट झाली. आमचं प्रोडक्शन सांभाळणारा संकेत बरे आहे. सेटवरचा पहिला दिवस माझ्या अजूनही लक्षात आहे.

अधिक वाचा-

मेकअपरुममध्ये माझी भेट घेण्यासाठी संकेत आला. त्याने मला तायडे अशी हाक मारली. त्या दिवसापासून तो मला तायडे अशीच हाक मारतो. माझ्या भावाचं नावही संकेत आहे.

सेटवरही या संकेतने मला भावासारखाच जीव लावला आहे. दोघांच्या नावात जसं साम्य आहे. अगदी तसंच साम्य त्यांच्या स्वभावातही आहे. माझ्या खोड्या काढणं, थट्टा मस्करी करण्यासोबतच तो माझी खूप काळजीही घेतो.

सिल्वासाला जेव्हा आमचं शूट सुरु होतं. तेव्हा तो रोज फोन करुन माझी आवर्जून चौकशी करायचा. आई कुठे काय करते मालिकेमुळे मला जशी संजना ही नवी ओळख मिळाली. त्याचप्रमाणे या मालिकेने मला एक भाऊही दिलाय. हे नातं मी आयुष्यभर जपेन.

हेदखील वाचलंत का-

पाहा व्हिडिओ- परदेशात कमावण्याची संधी देते हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण | Incet Hotel Management Institute

Back to top button