रश्मिका मंदाना हिला मिळाला होता दीड लाखाचा पहिला चेक | पुढारी

रश्मिका मंदाना हिला मिळाला होता दीड लाखाचा पहिला चेक

नवी दिल्ली : दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाने 2016 मध्ये ‘किरिक पार्टी’ या कन्नड चित्रपटातून आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली होती. मात्र, अवघ्या सहा वर्षांत ती नॅशनल क्रश बनली. अल्लू अर्जुनची प्रमुख भूमिका असलेल्या ‘पुष्पा : द राईज’ या चित्रपटामधील ‘सामी सामी’ या गाण्याने तर रश्मिकाने तमाम प्रेक्षकांची मन जिंकली. आता हीच अभिनेत्री ‘मिशन मजनू’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. खरे तर तिला अभिनेत्री बनावयाचे नव्हते. मात्र, तिची पहिली सॅलरी किती माहीत आहे का?

रश्मिकाने मॉडेलिंगच्या दुनियेत प्रवेश केला आणि तेथूनच तिच्यासाठी चित्रपटाचे दरवाजे उघडले. पहिला चित्रपट साईन केल्याची तिने घरी कोणालाच सांगितले नव्हते. मात्र, या चित्रपटासाठी वेतन म्हणून तिला अवघ्या दीड लाखाचा चेक मिळाला होता; पण हा चेक पाहून रश्मिकाची आई घाबरली होती.

Back to top button