नोरा फतेही तिच्या सुरक्षा रक्षकाला साडी धरायला लावल्यामुळे ट्रोल | पुढारी

नोरा फतेही तिच्या सुरक्षा रक्षकाला साडी धरायला लावल्यामुळे ट्रोल

मुंबई ; पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. डान्ससोबतच तिच्या अभिनयानेही लोकांना वेड लागलं आहे. यात अनेकदा तिच्या बोल्ड अंदाजाची चर्चा रंगताना दिसते. मात्र, यावेळी नोरा एक वेगळ्याच चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर नोराचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर नेटकऱ्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले आहे.

मानव मंगलानी यांनी हा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नोरा तिच्या कारमधून उतरुन व्हॅनिटी व्हॅनमध्ये जातांना दिसत आहे. ज्यात तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली असून मुंबईच्या मुसळधार पावसात ती साडी सांभाळताना तिच्या नाकीनऊ येताना दिसत आहे. चालू असणाऱ्या मुसळधार पावसाने नोरा फतेहीची सुद्धा पूर्ती वाट लावून टाकल्याचं दिसत आहे.

परंतु, यावेळी पाऊस पडत असल्यामुळे महागडी साडी भिजू नये यासाठी तीने सोबत असलेल्या सिक्युरिटी गार्डला साडी धरायला सांगत आहे. पण साडी हाताळणारा गार्ड चांगलाच भिजला आहे. त्यामुळेच तिला सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे.
तुझे कपडे तुला सांभाळता येत नाही का? असे एका यूजरने म्हटलं आहे. ‘तर, तुला जराही लाज वाटत नाही का त्याच्यासोबत असं वागताना?’, तुझा ड्रेस वाचवण्यासाठी तो पुर्ण भिजला आहे. ‘कुठली महाराणी लागून गेलीस तू’ तर एका युजरने तिला म्हटले आहे की, दुसऱ्या माणसाने स्वतः भिजून हिला मदत का करायची? तर सांभाळता येत नाही असे कपडे का घालायचे. अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

नोरा फतेही हिचा पिंक साडीमधला लुक येत्या काळात डान्स रिऍलिटी शो मध्ये पाहायला मिळणार आहे. नोरा सध्या नीतू कपूर यांच्यासोबत ‘दिवाने ज्युनियर्स’ नावाच्या रिऍलिटी शोचं परीक्षण करताना दिसते. ती लवकरच अजय देवगणसोबत थँक गॉड या चित्रपटात झळकणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

Back to top button