Darlings : आलियाच्या 'डार्लिंग्स' चित्रपटाचा टीझर रिलीज | पुढारी

Darlings : आलियाच्या 'डार्लिंग्स' चित्रपटाचा टीझर रिलीज

पुढारी ऑनलाईन डेस्क :

डार्लिंग्ज (Darlings) चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. आलिया भट्टचा हा चित्रपट OTT वर यादिवशी प्रदर्शित होणार आहे. आलिया भट्टचा आगामी डार्क कॉमेडी चित्रपट ‘डार्लिंग्ज’ चा टीझर रिलीज झाला आहे, ज्यामध्ये तिच्या पात्राचे अनेक कांगोरे पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट कधी प्रदर्शित होत आहे, हे आलियाने सांगितले आहे. (Darlings)

‘डार्लिंग्स’चा दमदार टीझर 

आलिया भट्टने या चित्रपटाचा टीझर इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. टीझरमध्ये जे काही दाखवले आहे ते सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेले आहे. आलियाने डार्लिंग्सचा टीझर शेअर करत लिहिले, ‘हे फक्त डार्लिंग्सला चिडवत आहे.’ या पोस्टच्या माध्यमातून तिने सांगितले आहे की, हा चित्रपट ५ ऑगस्टला नेटफ्लिक्सवर येत आहे.

बेडूक आणि विंचूची कथा

शाहरुखची कंपनी रेड चिलीज व्यतिरिक्त आलिया भट्ट आणि गौरव शर्मा यांनी संयुक्तपणे याची निर्मिती केली आहे. टीझरमध्ये बेडूक आणि विंचूच्या कथेतून चित्रपटाची कथा सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपटात आलिया भट्टशिवाय शेफाली शाह, विजय वर्मा आणि रोशन मॅथ्यू दिसणार आहेत.

आई मुलीची गोष्ट

‘डार्लिंग्स’ ही एका आई-मुलीची गोष्ट आहे, जी थोडी वेगळी वाटते. १ मिनिट ४० सेकंदाच्या या टीझरमध्ये आलिया भट्ट कधी लहान मुलीसारखी हसताना दिसत आहे तर कधी ती गंभीर तर कधी रागावलेली आहे. टीझरवरून हे स्पष्ट झाले आहे की, आलियाच्या व्यक्तिरेखेत अनेक भिन्न स्तर आहेत, जे नक्कीच आश्चर्यकारक दिसत आहेत. हा चित्रपट ५ ऑगस्टला OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

Back to top button