भारतीने घटवले वजन | पुढारी

भारतीने घटवले वजन

मुंबई : कॉमेडियन भारती सिंह हे मनोरंजन क्षेत्रातील एक मोठे नाव. एकवेळ तिचे फारच जास्त वजन होते. मात्र, तिने असे डायट अमलात आणले की, त्यामुळे तब्बल 15 किलो वजन कमी झाले.

3 जुलै रोजी वाढदिवस साजरा केलेल्या भारतीच्या वजनावर विनोदही झाले. मात्र, तिने कठोर परिश्रम घेत आपले वजन 15 किलोपेक्षाही जास्त कमी करून सर्वांना आश्‍चर्यचकित केले. ‘वेटलॉस जर्नी’दरम्यान भारतीने खास इंटरमिटेंट फास्टिंग अमलात आणले. या डायटवेळी भारती सायंकाळी सातनंतर काहीच खात नसे. त्यानंतर तिचे पुढचे जेवण दुसर्‍या दिवशी दुपारी 12 वाजल्यानंतरच असे. यामुळे तिला वजन कमी करणे शक्य झाले.

Back to top button