देवरकोंडाच्या ‘लाइगर’चे पोस्टर ठरले लोकप्रिय | पुढारी

देवरकोंडाच्या ‘लाइगर’चे पोस्टर ठरले लोकप्रिय

नवी दिल्ली : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांपैकी एक असलेला विजय देवरकोंडा आता बॉलीवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज झाला आहे. या अभिनेत्याचा ‘लाइगर’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. विजयने नुकतेच ‘लाइगर’चे एक पोस्टर रीलिज केले. या पोस्टरने चाहत्यांनाही क्रेझी बनविले आहे. सोशल मीडियावरही लोकांनी या पोस्टरचे कौतुक केले असून, विजय देवरकोंडाशी संबंधित अनेक हॅशटॅग्स ट्रेंड झाले आहेत. यामुळे दाक्षिणात्य अभिनेत्याच्या लाइगर पोस्टरने नवा इतिहास रचला आहे.

पोस्टर रीलिज झाल्यापासून प्रत्येकजण याचीच चर्चा करत आहे. यामुळेच पोस्टरच्या लोकप्रियतेने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. अवघ्या 24 तासांत या पोस्टरने खासकरून फिमेल चाहत्यांपासून ते मोठ्या हस्ती आणि प्रशंसकांमध्ये तसेच इंटरनेटवर एकच धूम निर्माण झाली आहे.

Back to top button