मिथुनदा की गोविंदा? 'चीकू की मम्मी दूर की'साठी कोणाची वर्णी?

मुंबई;पुढारी ऑनलाईन : मिथुनदा की गोविंदा? ‘चीकू की मम्मी दूर की’साठी कोणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. स्टार प्लसचा आगामी शो ‘चीकू की मम्मी दूर की’चा प्रोमो रिलीज झालाय. यामध्ये आई-मुलाच्या नात्याची सुंदर कहाणी सादर करण्यात आलीय. या शोमध्ये मिथुनदा की गोविंदा? येणार याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागली आहे.

परिधि शर्मा आणि वैष्णवी प्रजापति यांच्या या शोमध्ये आई-मुलाची सुंदर कहाणी दाखवण्यात आली आहे. जे एकमेकांपासून वेगळे होतात. आपल्यामधील नृत्याच्या सामायिक धाग्याने जवळ येतात. जिथे चाहते आतुरतेने या शोची वाट पाहत आहेत. स्टार प्लस आपल्या चाहत्यांसाठी मोठे सरप्राईज घेऊन सज्ज आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, स्टार प्लस या शोसाठी डिस्को डान्सर ‘मिथुन दा किंवा एटरनल सुपरस्टार गोविंदा’ यांना सहभागी करण्याचा विचार करत आहे.

‘सांग तू आहेस का’ : डॉ. वैभवी अर्थात शिवानी रांगोळे हिचा ग्लॅमरस अंदाज

मिथुन-गोविंदा

मिथुनदा आणि गोविंदा यांना पडद्यावर पाहण्याची संधी

मिथुनदा आणि गोविंदा यांना बॉलीवूडचे डान्सिंग लेजेंड मानले जातात. या शोमध्ये नृत्य एक महत्वपूर्ण बाजू आहे. यासाठी निर्मात्यांच्या मनात या शोच्या नव्या प्रोमोसाठी डांसिंग सुपरस्टारपेक्षा वेगळा विचार नाही आहे. मिथुनदा आणि गोविंदा यांना पडद्यावर आपल्या अनोख्या प्रतिभेसाठी ओळखले जाते. निर्माते या दोघांच्या नावाचा विचार करत आहेत. पण, या दोघांपैकी कोणालाही ऑनस्क्रीन पाहणे निश्चितपणे एक रोमांचक ट्रीट असेल.”

ही नक्कीच एक अशी बातमी आहे जी निश्चितच प्रेक्षकांना आपल्या स्क्रीनवर खिळवून ठेवेल!

हेही वाचलं का ?

पाहा व्हिडिओ- पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लिपने राज्यभर खळबळ

https://www.youtube.com/watch?v=StsVFW0XFyI

Exit mobile version