दिया मिर्झा म्हणते लग्नाआधी सेक्स ही आपली पर्सनल चॉईस | पुढारी

दिया मिर्झा म्हणते लग्नाआधी सेक्स ही आपली पर्सनल चॉईस

मुंबई; पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री दिया मिर्झाचे ट्वीट्स आणि तिची वक्तव्ये नेहमीच चर्चेत असतात व व्हायरल होत असतात. तिला प्रत्येक मुद्द्यावर आपले मत उघडपणे मांडयला आवडते. मग ते काहीही असो. सध्या दिया मिर्झा तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिया मिर्झाने एक मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्री दिया म्हणते की लग्नापूर्वी सेक्स आणि प्रेग्नेंसी ही पूर्णपणे स्वत:चा अधिकार आहे.

दिया मिर्झाचं म्हणणं आहे की, सगळ्यांनाच आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. त्यासाठी ते सोशल मीडियाची मदत घेऊ शकतात. नुकतेच दिया मिर्झाने एका संवेदनशील विषयाला हात घातला आहे. दियाने तिला लग्नाआधी सेक्स आणि प्रेग्नन्सी याबद्दल काय वाटतं, हे विचारलं असता ती म्हणाली, हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असायला हवा. ज्यांना आपल्या निर्णयामुळे काही धोका वाटत नाही, ते हा निर्णय घेऊ शकतात. ती पुढे हेही म्हणाली, एवढा विचार करू शकतील, इतके लोक पुरोगामी नाहीत.

दिया मिर्झाने फेब्रुवारी २०२१ मध्ये बिझनेसमन वैभव रेखीसोबत लग्न केले. दियाचे हे दुसरे लग्न आहे. लग्नानंतर दिया मिर्झाने एप्रिलमध्ये ती गरोदर असल्याची माहिती दिली होती. दियाला तिच्या लग्नावर आणि प्रेग्नेंसीवर अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी तू लग्नाआधी प्रेग्नन्ट होतील का, असा प्रश्नही तिला विचारला. यावरून तिला ट्रोल केले गेले होते. या प्रश्नावर दिया मिर्झाने स्पष्टीकरण दिले आहे की, तिने गरोदरपणामुळे लग्न केले नाही. दियाने मुलाचे नाव अव्यान असे ठेवले आहे.

दियाच्या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच अनुभव सिन्हा यांच्या ‘भीड’ या चित्रपटात दिसणार आहे. याआधी दिया मिर्झा ‘थप्पड’, ‘दस’ आणि ‘कॅश’ या चित्रपटांमध्ये दिसली होती. याशिवाय दिया मिर्झाकडे तापसी पन्नूचा ‘धक धक’ चित्रपटही आहे. यामध्ये फातिमा सना शेख, संजना संघी आणि रत्ना पाठक शाह या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dia Mirza Rekhi (@diamirzaofficial)

Back to top button