रियाची संघर्ष यात्रा सुरूच | पुढारी

रियाची संघर्ष यात्रा सुरूच

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर चर्चेत आलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती आपला वाढदिवस साजरा करत असली तरी ती अभिनयापेक्षा वादविवादांमुळे चर्चेत राहिली आहे. रियाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करून जवळपास 10 वर्षे उलटली. मात्र, अजूनही ती एका सुपरहिट चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहे. 1 जुलै 1992 रोजी बंगळूरूमध्ये जन्मलेल्या रियाने 2012 मध्ये आलेल्या ‘तुनिगा तुनिगा’ या तेलगू चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटाच्या अवघ्या एका वर्षानंतर म्हणजेच 2013 मध्ये ‘ममेरे डॅड की मारुती’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती सोनाली केबल, चेहेरे, जलेबी, बँक चोर यासारख्या हिंदी चित्रपटात दिसली. मात्र, रिया अजूनही बॉलीवूडमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी संघर्ष करत आहे.

Back to top button