Gayatri Datar : 'तुला पाहते रे' फेम गायत्री दातारचा हाॅट अंदाज | पुढारी

Gayatri Datar : 'तुला पाहते रे' फेम गायत्री दातारचा हाॅट अंदाज

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून अभिनेत्री गायत्री दातार (Gayatri Datar) महाराष्ट्रांच्या घराघरामध्ये पोहोचली आहे. या मालिकेनंतर गायत्रीचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. ईशा निमकर हे गायत्रीने साकरलेली भूमिका मराठी रसिकांना खूपच आवडली. गायत्रीने आपले हाॅट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेले आहेत. चाहत्यांनी तिच्या फोटोंना चांगले लाईक्स दिले आहेत.

gayatri datar

सरळ, साधी आणि सोज्वळ अशी ही ईशा, साकरण्यात गायत्री (Gayatri Datar) यशस्वी ठरली आहे. असं असलं तरी, खऱ्या वैयक्तिक जीवनात गायत्री स्वतः ए़़डव्हेंचरस आहे. गायत्री सोशल मीडिया चांगलीच सक्रीय असते. ती वेगवेगळ्या पोजमधील फोटोही तिथे शेअर करत असते.

gayatri datar

यावेळी गायत्रीने इन्स्टाग्रामवर हाॅट फोटो शेअर केलेले आहेत. त्यामध्ये गायत्री या फोटोंच्या कॅप्शनमध्ये म्हणते की, “गुलपोश कभी इतराये कहीं, महके तो नजर आ जाये कही.” गायत्रीच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांना मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे.

gayatri datar

गायत्रीला फिरायची आणि ट्रेकिंगची खूपच आवड आहे. तिने मनालीमध्ये ट्रेकिंगचा आणि कोयना नदीत रिव्हर राफ्टिंगचा अनुभव घेतलेला आहे. लेह लडाखसारख्या ठिकाणीही गायत्रीने भेट दिलेली आहे. तिथे फिरल्याचेही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेले आहेत.

हे वाचलंत का?

Back to top button