येऊ कशी तशी मी नांदायला : स्वीटू-ओम यांची समीप आली लग्नघटिका | पुढारी

येऊ कशी तशी मी नांदायला : स्वीटू-ओम यांची समीप आली लग्नघटिका

मुंबई;पुढारी ऑनलाईन : येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत स्वीटू-ओम यांची लग्नघटिका समीप आली आहे. मालविका स्वीटू-ओम यांच्या सुखात मिठाचा खडा टाकणार का? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.

अधिक वाचा – 

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका येऊ कशी तशी मी नांदायलामध्ये आता नलूने देखील परवानगी दिली आहे. मालिकेत सध्या आनंदी आनंद दिसतोय.

अधिक वाचा –

त्याचसोबत ओम खानविलकर आणि स्वीटू साळवी यांच्या लग्नाची लगबग देखील चालू आहे. ते दोघेही खूप खुश आहेत. कारण इतक्या कठीण प्रसंगांना तोंड देऊन शेवटी ते दोघे एकत्र येणार आहेत.

अधिक वाचा –

नुकताच ओम आणि स्वीटूचा साखरपुडा झालेला प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं. आता त्यांच्या लग्न सोहळा प्रेक्षक रविवार २२ ऑगस्ट रोजी २ तासांच्या विशेष भागात पाहू शकतील.

om sweetu
ओम-स्वीटू

लग्न सोहळा निर्विघ्न पार पडेल का?

या विशेष भागात लग्न सोहळा निर्विघ्न पार पडेल का? मालविका जी स्वीटू आणि ओम यांच्या नात्याने कधीच खुश नव्हती.

स्वीटू खानविलकरांची सून होऊ नये यासाठी मालविकाने आजवर खूप प्रयत्न केले. त्यांच्या प्रेमाच्या वाटेत अनेक अडथळे निर्माण केले.

पण, आता मालविका ओम खानविलकर आणि स्वीटूचं नातं मान्य करेल का. या लग्न सोहळ्यात देखील मोहित सोबत मिळून हे लग्न थांबवण्यासाठी काही वेगळा प्लॅन करेल? मालविकाचा डाव उधळून लावेल का ओम खानविलकर?.

मालविकाचा खरा चेहरा ओम समोर येईल का? या कपलचं लग्न सुरळीत संपन्न होईल का. मालविकाच्या मनाविरुद्ध स्वीटू खानविलकरांच्या घरात सून म्हणून प्रवेश करेल का?.

हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका. २ तासांचा लग्न सोहळा विशेष भाग २२ ऑगस्ट संध्याकाळी ७ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

हेदेखील वाचा- 

 

Back to top button