अभिजीत कोसंबी याचं नारळी पौर्णिमेला नवं गाणं येतंय | पुढारी

अभिजीत कोसंबी याचं नारळी पौर्णिमेला नवं गाणं येतंय

पुढारी ऑनलाईन : अभिजीत कोसंबी याचं नारळी पौर्णिमेला नवं गाणं येतंय. “पिरमाची गोडी लागलीया….” असे गाण्याचे बोल आहेत. अभिजीत कोसंबी याचं नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर सप्तसूर म्युझिकच्या युट्युब चॅनेलवर हे गाणं प्रदर्शित होत आहे.

अधिक वाचा-

“पिरमाची गोडी लागलीया …” या गाण्याची निर्मिती सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष यांची आहे. तर बीना राजाध्यक्ष सहनिर्मात्या आहेत. राहुल सूर्यवंशी यांनी लिहिलेल्या गाण्याला ऋषी बी. यांनी संगीतबद्ध केलं आहे.

अधिक वाचा-

abhijit kosambi
अभिजीत कोसंबी

देवबागच्या नितांत सुंदर परिसरात चित्रीकरण

देव झुंबरे, तेजल जावळकर आणि सुरभी सामंत यांच्यावर हे गाणं चित्रीत झालं आहे. अमोल गोळे यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे.

गुरु पाटील आणि महेश किल्लेदार यांनी म्युझिक व्हिडिओचं संकलन केलं आहे. देवबागच्या नितांत सुंदर परिसरात म्युझिक व्हिडिओचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. सारेगमप विजेता अशी ओळख असलेल्या गायक अभिजीतनं आतापर्यंत अनेक उत्तमोत्तम म्युझिक अल्बम केले आहेत. काही गाणी स्वतः संगीतबद्धही केली आहेत. मात्र “पिरमाची गोडी लागलीया ….” हे गाणं खूपच वेगळं ठरणार आहे.

कोळी बांधवांसाठी उत्पन्नाचं साधन असलेला समुद्र आणि पुन्हा मासेमारीची सुरुवात करून देणारा नारळी पौर्णिमेचा सण यांची सांगड या गाण्यात घालण्यात आली आहे.

अधिक वाचा-

तसंच त्याला हलका प्रेमाचा पदरही आहे. त्यामुळे नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर येणारं “पिरमाची गोडी लागलीया ….” नक्कीच प्रेक्षकांच्या मनाला साद घालेल.

हेदेखील वाचलंत का –

Back to top button