सलमान सपना चौधरीला म्हणाला, 'मुझसे शादी करोगी' | पुढारी

सलमान सपना चौधरीला म्हणाला, 'मुझसे शादी करोगी'

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : सपना चौधरीचा डान्स पाहण्यासाठी एक नाही तर हजारो चाहते तिच्यावर फिदा आहेत. तिचा डान्स पाहण्यासाठी हजारो चाहते जमा होताना दिसतात. सोशल मीडियावर तिचे अनेक फॉलअर्स आहेत. सपनाची लोकप्रियता इतकी जास्त आहे की तिच्या नवीन व जुन्या गाण्यांनीही सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सपना चौधरी ‘बिग बॉस 11’ मध्ये झळकल्यानंतर प्रकाशझोतात आली होती. आता याच दरम्यान तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर भरपूर पसंती मिळत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान सपना चौधरीसोबत जोरदार डान्स करताना दिसत आहे.

सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्यासोबत डान्स करताना सपना चौधरी

आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे. सपना चौधरीने बिग बॉसच्या मंचावर अक्षय कुमार आणि सलमान खानसोबत जोरदार डान्स करताना दिसत आहे. बिग बॉस सीझन ११ च्या भव्य कार्यक्रमात चाहत्यांची मने उंचावणाऱ्या सपना चौधरीने सलमान खान आणि अक्षयसोबत यांचे लोकप्रिय गाणे ‘मुझे शादी करोगी’ वर डान्स करताना जोरदार धुमाकूळ घातला आहे. सपनाच्या या डान्सने कार्यक्रमाची संध्याकाळ अधिक रोमांचक बनवली आहे. सोशल मीडियावरील तिच्या व्हिडिओने रसिकांना अक्षरश: वेड लावलं आहे.

सपना चौधरीचे बॉलिवूडमध्येही काम

सपना चौधरी प्रवास कदाचित बिग बॉसमध्ये बराच काळ राहिला नाही. हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी सध्या सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. सपनाने आपली एक वेगळी ओळख बनवली आहे आणि इतका मोठा पल्ला गाठला आहे. सपना आपल्या डान्ससाठी खूप प्रसिद्ध आहे तसेच तिचे लाखो चाहतेही आहेत. सपनाचे चाहते केवळ हरियाणापुरते मर्यादित नाहीत तर संपूर्ण देशभरात तिचे चाहते आहेत. सपनाने बिग बॉसमध्ये एंट्री केल्यानंतर तिला इतकी मोठी प्रसिद्धी मिळाली. सपना बिग बॉसच्या ११व्या हंगामात दिसली होती. येथूनच तिला वेगळी ओळख मिळाली. त्यानंतर तिचे फॅन फॉलोइंगही वाढले. सपनाची लोकप्रियता वाढली. यानंतर सपनाने आपल्या करियरची सुरुवात अगदी लहानपणापासूनच केली होती. यशाचा हा प्रवास त्याच्यासाठी इतका सोपा नव्हता. सपना केवळ हरियाणवीमध्येच नाही तर भोजपुरी, पंजाबी आणि बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम करताना दिसली आहे. सध्या ती तिच्या स्टायलिश फोटोशूटमुळे बरीच चर्चेत असते.

सपना स्टेजवर परफॉर्म करत असेल किंवा व्हिडिओ अल्बममध्ये नेहमी ती नेहमी पारंपरिक अंदाजातच पाहायला मिळते. दिलखेचक डान्सने रसिकांची मनं जिंकणारी सपनाने नेहमीच आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओंनी सोशल मीडियावर धुमाकुळ घालत असते.

Back to top button