शाहरूखच्या चित्रपटात दीपिकाचा कॅमिओ | पुढारी

शाहरूखच्या चित्रपटात दीपिकाचा कॅमिओ

दीपिका पदुकोणने शाहरूखच्या ‘ओम शांती ओम’मधून पदार्पण केले होते. या पहिल्याच चित्रपटात तिने दुहेरी भूमिका साकारली होती, हे विशेष. आता एक आघाडीची अभिनेत्री असलेल्या दीपिकाचे शाहरूख किंवा फराह खानबरोबर तितकेच चांगले संबंध आहेत. त्यामुळेच शाहरूखच्या आगामी ‘जवान’ चित्रपटात ती कॅमिओ म्हणजेच पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

शाहरूखबरोबर ती ‘पठाण’मध्येही झळकत आहे. ‘जवान’ या चित्रपटात शाहरूखसमवेत दक्षिणेतील सुपरस्टार नयनतारा आहे. तिचे अलीकडेच दिग्दर्शक विघ्नेश शिवनबरोबर लग्‍न झाले असून, या सोहळ्यात शाहरूखही हजर होता.

‘जवान’मध्ये राणा डग्गुबती, सान्या मल्होत्रा व सुनील ग्रोव्हर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. दीपिका रणबीर कपूरच्या ‘ब-ह्मास्त्र’मध्येही छोट्या भूमिकेत आहे. हृतिक रोशनबरोबरच्या ‘फायटर’ या चित्रपटातही ती झळकणार आहे.

Back to top button