Urfi Javed video : टॉपलेस होवून उर्फीने चक्क गुडांळल्या विजेच्या तारा | पुढारी

Urfi Javed video : टॉपलेस होवून उर्फीने चक्क गुडांळल्या विजेच्या तारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस ओटीटी फेम आणि अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या अंतरंगी फॅशनने नेहमी चर्चेत येत असते. हटके आणि शार्ट कपडे तिचे समीकरण बनले आहे. यामुळे कधी- कधी उर्फीला जोरदार ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. तर सध्या ती विजेची तारांचा ड्रेस परिधान केल्याने पुन्हा चर्चेत आली आहे. ( Urfi Javed video )

अभिनेत्री उर्फी जावेदने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर एक लेटेस्ट व्हिडीओ ( Urfi Javed video ) शेअर केला आहे. यामध्‍ये  पहिल्यांदा उर्फी स्पिच रंगाच्या टिशर्टमध्ये वायर आपल्या शरीराभोवती गुंडाळताना दिसली आहे. यानंतर लगेच मात्र, तिने त्याच निळ्या रंगाच्या विजेच्या तारांचा आउटफिट परिधान केला आहे. शेअर झालेल्या व्हिडिओमध्‍ये उर्फीच्या समोर लाबलंचक मोठा विजेच्या तारादेखील दिसल्या आहेत.

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने ‘ही खरोखरचं भली मोठी वायर आहे!. तर या वायरींचे कोठही कटिंग केलेले नाही. मला हा निळ्या रंगाच्या वायरीचा ड्रेस खूपच आवडला आहे. यामुळे आणखीही पुढे अनेक रंगाचा वापर करणार आहे. रोज नवनवीन मला प्रयोग करायचे आहेत. त्यातील हा एक. ‘ असे तिने म्हटले आहे. उर्फीचा हा व्हिडीओ पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने कोतुक करताना ‘fire 🔥’, ‘Awesome ❤’, ‘So hot’ असे म्हटले आहेत. तर आणखी काही युजर्सने ‘उर्फी ५ मिनिटांसाठी वायर द्यावी’, ‘ कोणीतरी स्विच चालू करा’, ‘बेचारीकडे घालायला कपडे नाहीत’, ‘कपडे लटकवायला वायर द्या’, ‘वायर कितीला विकत घेतलीस?’, ‘एवढेच आता बाकी राहिलं होतं’. ‘देशी लेडी गागा’, ‘शादी कर लो’, ‘तुझी कॉपी कोणीच करू शकत नाही’ यासारख्या कॉमेन्टस करत ट्रोल केले आहे. याशिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट, फायर आणि लव्हलीचे ईमोजी शेअर केले आहेत. या व्हिडिओला आतापर्यत्न एका लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहेत.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

Back to top button