कॅटरिना आणि अमिताभ बच्चन यांची बाल्कीच्या चित्रपटात एंट्री | पुढारी

कॅटरिना आणि अमिताभ बच्चन यांची बाल्कीच्या चित्रपटात एंट्री

पुढारी ऑनलाईन : कॅटरिना आणि अमिताभ बच्चन यांची बाल्कीच्या चित्रपटात एंट्री झाली आहे. अद्याप नाव निश्‍चित न झालेल्या या चित्रपटात आता अमिताभ बच्चन आणि कॅटरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका असतील.

अधिक वाचा-

काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक आर. बाल्की एक थ्रिलर चित्रपट करत असल्याच्या आणि त्यामध्ये सनी देओल, दुलकर सलमान, पूजा भट्ट यांच्या भूमिका असल्याच्या बातम्या आल्या होत्या. कॅटची भूमिकाही तगडी असल्याचे सांगितले जात आहे.

अधिक वाचा-

तर अमिताभ यांची भूमिका लहान असली, तरी महत्त्वाची असणार आहे. (तसेही, आर. बाल्कीचा चित्रपट अमिताभ बच्चनशिवाय पूर्णच होत नाही. त्याच्या प्रत्येक चित्रपटात सीनिअर बच्चन असतातच)

अधिक वाचा-

दरम्यान, बिग बी आणि कॅट यांनी यापूर्वी ‘बूम’, ‘सरकार’, ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ हे चित्रपट एकत्रित केले आहेत.

हेदेखील वाचा- 

Back to top button