सलमानच्या चित्रपटात राम चरण | पुढारी

सलमानच्या चित्रपटात राम चरण

सलमान खानचा ‘कभी ईद, कभी दिवाली’ हा चित्रपट या ना त्या कारणाने सतत चर्चेत असतो. आता या चित्रपटाचे नाव ‘भाईजान’ असे ठेवलेले आहे. या ‘भाईजान’मध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण हा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. राम चरण हा ‘आरआरआर’मुळे हिंदी पट्ट्यातही लोकप्रिय झालेला अभिनेता आहे. सध्या सलमान हैदराबादमध्येच या चित्रपटाचे शूटिंग करीत आहे. त्यामधील गाण्यात कॅमिओ करण्याची ऑफर सलमानने देताच राम चरणने लगेचंच होकार दिला. राम चरणचे वडील अभिनेता चिरंजीवी आणि सलमान यांची चांगली मैत्री आहे. सलमान खानच्या ‘भाईजान’मध्ये पूजा हेगडे, शहनाज गिल, व्यंकटेश, जस्सी गिल, पलक तिवारी आणि राघव जुयाल यांच्याही महत्त्वाच्या भूूमिका आहेत. फरहाद सामजी या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत.

Back to top button