अमिताभ-शाहरूख ‘डॉन-3’ मध्ये एकत्र? | पुढारी

अमिताभ-शाहरूख ‘डॉन-3’ मध्ये एकत्र?

फरहान अख्तर आता ‘डॉन-3’ बनविणार असल्याचे म्हटले जात आहे. त्याने या चित्रपटाच्या पटकथेवरही काम सुरू केले आहे. यावेळेची कल्पना वेगळी आणि अधिक कमालीची असल्याचीही चर्चा आहे. या नव्या चित्रपटात ‘ओरिजिनल डॉन’ अमिताभ बच्चन व नवा ‘डॉन’ शाहरूख खान हे दोघेही एकत्र असावेत, अशी फरहानची इच्छा आहे. चंद्रा बरोट दिग्दर्शित ‘डॉन’ 1978 मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये बिग बीशिवाय झिनत अमान, प्राण आणि इफ्तेखार यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. 2006 मधील नव्या ‘डॉन’मध्ये शाहरूख खान व प्रियांका चोप्रा यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.

Back to top button