सैफ अली खानच्या ‘भूत पोलीस’ चा ट्रेलर रिलीज | पुढारी

सैफ अली खानच्या ‘भूत पोलीस’ चा ट्रेलर रिलीज

मुंबई ; पुढारी ऑनलाईन: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अर्जुन कपूर यांचा आगामी ‘भूत पोलीस’हा चित्रपट लवकरच भेटीला येत आहे. ‘भूत पोलीस’ या चित्रपटाचा सध्या ट्रेलर रिलीज झाला आहे.

भूत पोलीस या चित्रपटात सैफ अली खान आणि अर्जुन कपूरसोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम दिसणार आहे. ‘भूत पोलीस’ हा एक हॉरर कॉमेडीवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पवन कृपलानी यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती रमेश तौरानी आणि आकाश पुरी यांची केली आहे. हा चित्रपट पुढील महिन्यात १७ सप्टेंबर २०२१ रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.

भूत पोलीस चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

भूत पोलीस या चित्रपटाचा सध्या २ मिनिट ५० सेकंदाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये सैफ आणि अर्जुनची धमाकेदार एन्ट्री पाहायला मिळत आहे. या चित्रपटात सैफ अली खान आणि अर्जुन कपूर हे एकमेकांच्या पूर्णपणे उलट दाखविले आहेत.

सैफ हा सतत मजा- मस्ती करणारा तर अर्जुन ‘बाबा की किताब’ या पुस्तकातील भूत काढण्याच्या गोष्टींचा अभ्यास करताना दिसत आहे.

भूत पोलीस या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा ट्रेलर आतापर्यंत ४ लाखांहून अधिक चाहत्यांनी पाहिला आहे. त्यामुळे चाहत्यांची या चित्रपटासाठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यापूर्वी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर रिलीज झाले होते.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात या चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाली होती. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जानेवारी महिन्यात चित्रपटाचे शुटिंग थांबविण्यात आले.

यानंतर हा चित्रपट १० सप्टेंबर २०२१ रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार होता. पण तेव्हाही कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता १७ सप्टेंबर २०२१ रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button